AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran-US War Situation : ओळखपत्रांचे पुरावे तयार ठेवा आणि… इराण मधल्या भारतीय दूतावासाची मोठी घोषणा

Iran-US War Situation : इराणमधल्या भारतीय दूतावासाने एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिच्या दोन शक्तीशाली विमानावाहू युद्धनौका अब्राहम लिंक आणि गेराल्ड फोर्ड या इराण जवळच्या समुद्रात तैनात आहेत.

Iran-US War Situation : ओळखपत्रांचे पुरावे तयार ठेवा आणि... इराण मधल्या भारतीय दूतावासाची मोठी घोषणा
Iran-US
| Updated on: Feb 23, 2026 | 3:07 PM
Share

इराणच्या अणवस्त्र आणि बॅलेस्टिक मिसाईल कार्यक्रमावरुन मागच्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत चर्चा सुरु आहेत. पण यावर अजूनपर्यंत कुठलाही तोडगा दृष्टीपथात आलेला नाही. फक्त सकारात्मक चर्चा झाली असं इराणकडून सांगितलं गेलय. आता इराण-अमेरिका तणाव प्रचंड वाढला आहे. कुठल्याही क्षणी युद्धाची शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना इराण सोडण्याचं आवाहन केलय. भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना ओळखपत्रांचे पुरावे तयार ठेवण्यास सांगितले असून दूतावासाच्या संपर्कात रहाण्यास सांगितलं आहे. ज्या भारतीयांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांना दूतावासाच्या अधिकृत लिंकवरुन रजिस्ट्रेशन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अमेरिच्या दोन शक्तीशाली विमानावाहू युद्धनौका अब्राहम लिंक आणि गेराल्ड फोर्ड या इराण जवळच्या समुद्रात तैनात आहेत.

तेहरानमधील भारतीय दूतावासाने 23 फेब्रुवारी 2026 च्या आपल्या मागच्या सल्ल्याचा पुनरुच्चार केला आहे. इराणमधील विद्यमान भारतीय नागरिकांनी (विद्यार्थी, तीर्थयात्री, व्यापारी, पर्यटक) यांना कमर्शिअल विमानांसह उपलब्ध साधनांचा वापर करुन देश सोडण्याचं आवाहन केलं आहे. एडवायजरीमध्ये इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला आहे. विरोध प्रदर्शनं टाळण्याचा, दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा आणि आपली कागदपत्र तयार ठेवण्याचं आवाहन करण्यात आलय. मदतीसाठी आपातकालसीन हेल्पलाइन नंबर आणि दूतावासाच्या संपर्काच विवरण देण्यात आलय.

हेल्पलाइन नंबर काय?

इराणमध्ये इंटरनेटच्या समस्येमुळे नागरिक रजिस्ट्रेशन करु शकत नसतील, तर भारतात राहणार्‍या कुटुंबांच्या सदस्यांना रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं अपील करण्यात आलय. त्याशिवाय मदतीसाठी भारतीय दूतावासाने अनेक आपातकालीन हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. यात मोबाइल नंबर +989128109115, +989128109109, +989128109102 और +989932179359 आहे. त्याशिवाय नागरिक cons.tehran@mea.gov.in वर ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधू शकतात.

खूप वाईट परिणाम भोगावे लागतील

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला, त्यांच्या अणवस्त्र कार्यक्रमावर तडजोड करण्यासाठी 10 ते 15 दिवसांची मुदत दिली आहे. ऐकलं नाही, तर खूप वाईट परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आहे. अमेरिकेने मध्य-पूर्वेत मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती केली आहे.

Follow Us
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा मुंडे हे काय बोलून गेल्या?
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
Dada Bhuse | पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा... नेमकं काय म्हणाले?
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग दुसरीकडे आईनं संपवलं जीवन
सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वड
Dhule | सुरत बायपासवर मृत्यूचा सापळा! कंटेनरच्या धडकेत 5 वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा मृत्यू
उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट?
मोठी बातमी! उपसभापतीपदी निवड झाल्यानंतर सचिन अहिरांना शिंदे गटाकडून मोठं गिफ्ट? थेट वरळीतच...
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?
देवाभाऊ-शिंदेभाऊंना लाडक्या बहिणींचा खर्च जड झाला का?; सुनेत्रा पवारांना रोहिणी खडसेंचं थेट आवाहन, म्हणाल्या...
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!