डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! इराणने अमेरिकेचे फायटर जेट पाडले; पहा Video

War update : इराणने आज कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यांमुळे अमेरिकेला मोठा हादरा बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! इराणने अमेरिकेचे फायटर जेट पाडले; पहा Video
Jet
Image Credit source: X
| Updated on: Mar 02, 2026 | 4:17 PM

अमेरिका आणि इस्रायलच्या हल्यांना इराणकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणने काल दुबईवर हल्ले केले. त्यानंतर आज कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमुळे अमेरिकेला मोठा हादरा बसला आहे. कुवेती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सोमवारी सकाळी इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक अमेरिकन लष्करी विमाने नष्ट झाली आहेत. या विमानातील क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत, कारण त्यांनी वेळीच बाहेर उड्या मारल्या. या बातमीने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

इराणने अमेरिकेची विमाने पाडली

कुवेतच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी एक निवेदन जारी केले. यात त्यांनी म्हटले की या हल्ल्यानंतर, संबंधित अधिकाऱ्यांनी ताबडतोब शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. पायलट आणि इतर सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतरच्या परिस्थितीबाबत अमेरिकन सैन्याशी बोलणं सुरू आहे. सध्या संयुक्त तांत्रिक उपाययोजना राबविल्या जात आहेत. संबंधित अधिकारी घटनेच्या कारणांची चौकशी करत आहेत.

अमेरिकेकडून कोणतेही भाष्य नाही

कुवेतमधील या हल्लांवर अमेरिकेने अद्याप भाष्य केलेले नाही. याबाबतच्या माहितीसाठी विनंती करूनही यूएस मिलिटरी सेंट्रल कमांडने अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही. इराणने कुवेतमध्ये अनेक अमेरिकन लढाऊ विमाने पाडली आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एका अमेरिकन F-15 लढाऊ विमानाला ड्रोनने पाडले आहे. याचा व्हिडिओही समोर आला आहे.

आतापर्यंत 555 लोकांचा मृत्यू: रेड क्रेसेंट

या युद्धात इराणमध्ये मोठी जीवितहाणी झाली आहे. इराणी रेड क्रेसेंट सोसायटीने सोमवारी म्हटले की, अमेरिका आणि इस्रायली हवाई हल्ल्यात किमान 555 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या युद्धात आतापर्यंत 131 शहरांचे नुकसान झाले आहे. रेड क्रेसेंटचे मानवतावादी अभियान सुरू आहे. बाधित भागात बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. मानवतावादी सेवा, मदत आणि मानसिक सामाजिक समर्थन देण्यासाठी सुमारे 40 लाख स्वयंसेवक तयार असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us