AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नको तेच झालं! इराणच्या न्यूक्लियर साईटवर हल्ला, जग संकटात? रेडियशनमुळे टेन्शन वाढलं

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायल हे दोन्ही देश मिळून इराणवर हल्ला करत आहेत. आता या दोन्ही देशांनी थेट इराणच्या न्यूक्लिअर प्लांटवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.

नको तेच झालं! इराणच्या न्यूक्लियर साईटवर हल्ला, जग संकटात? रेडियशनमुळे टेन्शन वाढलं
न्यूक्लियर प्लांटImage Credit source: AP
| Updated on: Mar 02, 2026 | 3:57 PM
Share

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध आता पेटले आहे. अमेरिका आणि इस्त्रायलने इराणच्या नतांज न्यूक्लियर सुविधेवर (Natanz Nuclear Facility) हल्ला केला आहे. या हल्लानंतर जगात खळबळ माजली आहे. याचा हल्लामुळे आता रेडिएशनचा धोका निर्माण झाला आहे.

अंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीचे (IAEA) महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे रेडियोलॉजिकल रिलीज (रेडिएशन लीक) होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे मोठी शहरे रिकामी करण्याची वेळ येऊ शकते. त्यांनी सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि कूटनीतिक मार्गाने चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

इराणचा मोठा दावा

इराणच्या IAEAचे प्रतिनिधी रेझा नजाफी यांनी व्हिएन्ना येथील बोर्ड ऑफ गवर्नर्सच्या बैठकीत सांगितले की, अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणच्या शांततापूर्ण आणि IAEA संरक्षित न्यूक्लियर सुविधांवर हल्ला केला आहे. त्यात नतांज हे ठिकाण निशाण्यावर होते. IAEA ने सध्या सांगितले आहे की, साइटच्या बाहेर रेडिएशन स्तर सामान्य आहे आणि कोणतीही असामान्य वाढ दिसलेली नाही. पण ते इराणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत (संपर्क मर्यादित असल्याने प्रतिसाद मिळत नाही). तरीही, IAEA ने न्यूक्लियर सुविधांवर हल्ले कधीही करू नयेत असे सातत्याने सांगितले आहे. कारण यामुळे लोक आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

भारतीय पर्यटक अडकले परदेशात

मध्य पूर्व शहरात तणाव वाढल्यामुळे इराणने दुबईसह काही आखाती देशांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे सुरक्षेच्या कारणास्तव दुबई, अबुधाबी आणि शारजाह यांसारख्या प्रमुख विमानतळांवरील सर्व उड्डाणे तात्काळ थांबवण्यात आली आहेत. परिणामी पर्यटनासाठी, कार्यक्रमांसाठी किंवा शिक्षणासाठी गेलेले पुणे, मुंबई, सांगली, जळगाव आणि अहिल्यानगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेकडो प्रवासी सध्या दुबईतील हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत. ज्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...