War Update : अमेरिका-इस्रायलचे सैन्य इराणमध्ये घुसणार? खामेनींच्या मृत्यूनंतर काय असेल पुढचे पाऊल?

War Latest Update : अमेरिका आणि इस्रायल यांच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता अमेरिकन आणि इस्रायली सैन्य इराणी भूमीवर उतरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

War Update : अमेरिका-इस्रायलचे सैन्य इराणमध्ये घुसणार? खामेनींच्या मृत्यूनंतर काय असेल पुढचे पाऊल?
US Army
Image Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2026 | 4:05 PM

इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता अमेरिकन आणि इस्रायली सैन्य इराणी भूमीवर उतरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूची घोषणा करताना म्हटले की, केवळ हवाई हल्ल्यांद्वारे सरकार बदलणे कठीण आहे. मात्र सैन्य तैनात करणे हा एक मोठा धोका असेल. त्यामुळे आता आगामी काळात इस्रायल आणि अमेरिका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अमेरिका आणि इस्रायलचे पुढचे पाऊल काय?

अमेरिका आणि इस्रायलने या युद्धाबाबत बोलताना अनेकदा म्हटले आहे की, आमचे उद्दिष्ट इराणचा अणुकार्यक्रम उध्वस्त करणे आणि सरकार कमकुवत करणे हे आहे. यामुळे इराणी जनतेला सरकार बदलण्याची संधी मिळेल. मात्र इतिहासात अशा हल्ल्यांमुळे अनेकदा अराजकता निर्माण होते आणि युद्धे लांबतात असे घडलेले आहे. त्यामुळे आता इस्रायल आणि अमेरिकेचे पुढचे पाऊल काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

जमिनीवरून हल्ला होणार?

अमेरिका आणि इस्रायलने आम्ही इराणमध्ये जमिनीवरील सैन्य पाठवणार नाही अशी माहिती दिली आहे. वॉल स्ट्रीट जर्नल आणि बीबीसीमधील वृत्तांनुसार ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हा हवाई हल्ला होता. अमेरिकन जनतेला जमिनीवर हल्ला नको आहे.’ तज्ज्ञांच्या मते इराणचे सैन्य मजबूत आणि गनिमी युद्ध करण्यास सक्षम आहे, त्यामुळे अमेरिकन सैनिक इराणमध्ये उतरले तरी याचा मोठा फटका अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे.

अमेरिकेला अतिरिक्त सैनिक लागणार

मात्र, काही तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, इराणमधील सरकार उलथवून टाकण्यासाठी जमिनीवरून हल्ला करणे आवश्यक आहे. माक्र ट्रम्प यांनी तसे आदेश दिले नाहीत. आगामी काळात असा काही निर्णय झाला तर प्रथम हवाई हल्ल्यांनी इराणच्या सैन्याला आणखी कमकुवत करावे लागेल. त्यानंतर महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यासाठी विशेष दल पाठवावे लागेल. सध्या मध्य पूर्वेत 30 ते 40 हजार अमेरिकन सैनिक आहेत. मात्र इराणवर जमिनीवर हल्ला करण्यासाठी लाखो सैनिकांनी गरज भासणार आहे.

इराणमध्ये सैन्य पाठवणे धोकादायक

काही वृत्तांनुसार, इस्रायली सैन्य लहान आहे, त्यामुळे ते जमिनीवरील कारवाईत भाग घेण्याची शक्यता कमी आहे. मात्र इराणमध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय झाला तर अमेरिका आणि इस्रायली सैनिक सीमेवरून इराणमध्ये प्रवेश करतील आणि तेहरानसारखी महत्त्वाची शहरे ताब्यात घेतील. तसेच अणुप्रकल्पही ताब्यात घेतील. मात्र हे धोकादायक आहे. कारण इराणमध्ये प्रवेश करताना हिजबुल्लाह आणि हुथीसारखे इराणी प्रॉक्सी गट हल्ले करू शकतात. त्यामुळे इराणमध्ये सैन्य पाठवण्याचा निर्णय महागात पडू शकतो.

Follow Us