AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता पाकिस्तानही युद्धात उतरणार? थेट करणार या देशावर हल्ला; हादरवून टाकणारी माहिती समोर!

War Update : इराणने सौदी अरेबियातील काही भागांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात इतरही अनेक देश युद्धात उतरण्याची शक्यता आहे. आता पाकिस्तान सौदी अरेबियाच्या मदतीला धावण्याची शक्यता आहे.

आता पाकिस्तानही युद्धात उतरणार? थेट करणार या देशावर हल्ला; हादरवून टाकणारी माहिती समोर!
Pakistan and WarImage Credit source: Google
| Updated on: Mar 01, 2026 | 3:57 PM
Share

इराण आणि इस्रायल यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता मध्य पूर्वेत भीषण इराणकडून भीषण हल्ले होत आहे. ज्या देशांमध्ये अमेरिकन तळ आहेत, त्या तळांवर इराणकडून हल्ले करण्यात येत आहेत. इराणने सौदी अरेबियातील काही भागांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे आता आगामी काळात इतरही अनेक देश युद्धात उतरण्याची शक्यता आहे. आता पाकिस्तान सौदी अरेबियाच्या मदतीला धावणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

संपूर्ण जग चिंतेत

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्य पूर्व आशियातील सर्व देशांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता जगातील इतरही देश या युद्धात उतरण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये संरक्षण करार झालेला आहे. त्यामुळे आता सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये काय करार झालेला आहे?

सप्टेंबर 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि अण्वस्त्रधारी पाकिस्तान यांच्यात “स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स करार” झाला होता. या करारात दोन्ही देशांनी म्हटले की, “कोणत्याही देशाविरुद्ध कोणताही हल्ला हा दोघांविरुद्ध हल्ला मानला जाईल.” या करारानंतर पाकिस्तानला आगामी काळात फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता सौदी अरेबियावर हल्ला झाला आहे. त्यामुळे आता या करारानुसार पाकिस्तानवरही हा हल्ला मानला जात आहे. त्यामुळे पाकिस्तान या युद्धात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानची रणनिती काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सौदी अरेबियाचा शत्रू कोण?

सौदी अरेबियाचे इराण आणि इस्रायल हे दोन प्रमुख शत्रू आहेत. सौदी अरेबिया आपल्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. ग्लोबल फायरपॉवर डेटाबेसनुसार, जगातील सर्वात शक्तिशाली 145 देशांच्या यादीत सौदी अरेबिया 24 व्या क्रमांकावर आहे, तर पाकिस्तान 12 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हे दोन्ही देश एकत्र आले तर ताकद आणखी वाढते. त्यामुळे आता पाकिस्तान काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...