आता होर्मुझमध्ये एकही…इराणचं अमेरिकेविरोधात सर्वात मोठं पाऊल, संपूर्ण जगात खळबळ!

इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अमेरिकेने नाकेबंदीचा निर्णय घेतल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा धारण केला आहे.

आता होर्मुझमध्ये एकही...इराणचं अमेरिकेविरोधात सर्वात मोठं पाऊल, संपूर्ण जगात खळबळ!
strait of hormuz
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 13, 2026 | 6:05 PM

Iran Israel War : अमेरिका-इराण यांच्यातील इस्लामाबादमधील बैठक अयशस्वी ठरल्यानंतर आता पुन्हा युद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. होर्मुझची सामुद्रधुनी जलव्यापारासाठी खुली करण्याच्या मुद्द्यावरून या दोन्ही देशांत एकमत झाले नाही. परिणामी आता दोन्ही देशांचे संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत. ही बैठक निष्फळ ठरताच आता अमेरिकेने आक्रमक पवित्रा धारण करत होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे इराणपुढे मोठा आव्हान निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या या धोरणामुळे आता इराणनेही संताप व्यक्त करत होर्मुझच्या सामुद्रधुनीतील कोणत्याच देशाचे बंदर सुरक्षित राहणार नाही, असी थेट धमकीच दिली आहे.

इराणची नेमकी भूमिका काय?

अमेरिकेने इराणची बंदरं आणि किनारपट्टीवर नाकेबंदी लागू केली आहे. त्यानंतर आता इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीशी जोडल्या गेलेल्या ओमानचे आखात आणि पर्शियन आखातातील बंदरांना थेट धमकी दिली आहे. या दोन्ही आखातातीली सर्वच बंदरांना सुरक्षा असेल किंवा कोणासाठीही नसेल, असे इराणने म्हटले आहे. आपल्या देशातील कायद्यांचे रक्षण करणे हे इराणी सेनेचे स्वाभाविक कर्तव्य आहे, असेही इराणी सेनेने म्हटले आहे.

इराणची नेमकी भूमिका काय?

अमेरिकेकडून आमच्या बंदरांना धोका निर्माण झाला तर दोन्ही आखातातील कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही, असा थेटइशारा इराणने दिला आहे. तसेच अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय समुद्रात जहाजांच्या प्रवासावर बंधनं घालणं हे नियमबाह्य आहे, असा थेट हल्लाबोल इराणने केला आहे.

अमेरिकेने नेमकं काय केलं?

अमेरिकेकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी केली जात आहे. ही नाकेबंदी इराणच्या मालकीची बंदरं तसेच आसपासच्या भआगात असलेल्या जहाजांवर लागू असेल. इराणला अमेरिकेची ही भूमिका मान्य नाही. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिली बैठक निष्फळ ठरल्याने आता पुन्हा दुसरी बैठक आयोजित केली जाणार का? ही बैठक आयोजित करण्याचे ठरलेच तर पाकिस्तानची यात काय भूमिका असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us