AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणचा आता पाकिस्तानच्या मित्रावर हल्ला, ड्रोन डागल्याने एअरपोर्टला लागली आग…

इराणने मुस्लीम राष्ट्रांवरच हल्ला करण्याचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. त्यामुळे ही मुस्लीम राष्ट्रे कोंडीत सापडली आहेत. जर इराणवर हल्ला केला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लीमांच्या रोषाला सामोरे जावे लागणार या भीतीत ही राष्ट्रे आहेत...

इराणचा आता पाकिस्तानच्या मित्रावर हल्ला, ड्रोन डागल्याने एअरपोर्टला लागली आग...
Iran Israel War
| Updated on: Mar 05, 2026 | 4:31 PM
Share

इस्राईल आणि अमेरिकेने २८ फेब्रुवारीपासून इराणवर हल्ला सुरु केला आहे. या युद्धाला आज सहा दिवस झाले आहेत. आता इराणने पाकिस्तानच्या मित्रावर ड्रोनने हल्ला केला आहे. त्यामुळे आता युद्धाचा नवा मोर्चा उघडला गेला आहे. आतापर्यंत इराणने कतार, युएई, दुबई, सौदी अरब अशा मुस्लीम राष्ट्रातील अमेरिकन तळांना टार्गेट केले होते. आता नवी आघाडी उघडली आहे.

इराणने आज पाचव्या दिवशी युद्धाची व्याप्ती वाढवली आहे. इराणने आता अझरबैझानवर ड्रोन डागले आहेत. बातम्यांनुसार अझरबैझानमधील नखचिवन एअरपोर्टवर इराणने ड्रोनने हल्लाबोल केला आहे. अझरन्यूजच्या वृत्तानुसार अझरबैझानने इराणच्या हद्दीतून झालेल्या या ड्रोन हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. या हल्ल्यात नखचिवन ऑटोनॉमस रिपब्लिकला टार्गेट केले आहे. ज्यात इन्फ्रास्ट्क्चरचे नुकसान झाले आणि सर्वसामान्य लोक जखमी झाले आहेत. अझरबैजान हा पाकिस्तानचे मित्र राष्ट्र असून भारताविरोधात सतत वक्तव्य करत असते.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारी  ५ मार्च २०२६ रोजी दुपारी घडली आहे. अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की इराणच्या नखचिवनच्या दिशेने दोन ड्रोन लाँच केले होते. बातमीनुसार एक ड्रोन नखचिवन आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या टर्मिनल बिल्डींगवर कोसळले, ज्यामुळे फॅसिलिटीचा एक भाग डॅमेज झाला आहे. येथे आग लागली आहे. दुसरा ड्रोन शेखराबाद गावातील एक शालेय इमारतीच्या जवळ क्रॅश झाले आहे. अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्ल्यात दोन सर्वसामान्य नागरिक जखमी झाले आहे. आणि एअर पोर्टच्या इमारतीला नुकसान पोहचले आहे. इराणच्या या पावलाने युद्धाची व्याप्ती वाढली आहे.

आम्हाला उत्तर देण्याचा अधिकार- अझरबैजान

अझरबैजानने हल्ल्याचा निषेध केला आहे. आणि म्हटले की या प्रकारच्या कृती या आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहेत. अझरबैजान यांनी हे स्पष्ट केले की याने तणावात वाढ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात औपचारिक निषेध नोंदवण्यासाठी इराणच्या राजदूतांना पाचारण करण्यात आले आहे.तेहरानने या प्रकरणात स्पष्टीकरण द्यावे आणि भविष्यात अशी चुक होऊ नये अशीही तंबी देण्यात आली आहे.

या घटनेनंतर अझरबैजानमधील इराणचे एम्बेसेडर असलेल्या मोजतबा डरमिचिलू यांना परराष्ट्र मंत्रालयाने पाचारण केले आहे. अझरबैजानच्या अधिकाऱ्यांनी इराणकडे निषेध नोंदवला आहे. ऑनलाईन शेअर केलेल्या व्हिडीओत एअरपोर्टच्या आजूबाजूला फ्लॅश आणि धमाके झालेले दिसत आहेत. युजर्सने आरोप केला आहे की इराण, युनायटेड स्टेट्स आणि इस्राईल दरम्यान चालू असलेल्या संघर्षांत या जागेला टार्गेट करण्यात आले आहे.

ही घटना अशा वेळी घडली आहे, जेव्हा इराणच्या विरोधात अलिकडच्या मिलिट्री ऑपरेशननंतर या भागात तणाव वाढलेला आहे. ज्यामुळे प्रत्युत्तरादाखल मिसाईल लाँच झाले आणि मोठ्या भागात संघर्षाची भिती निर्माण झाली आहे. नखचिवन, इराण, तुक्रीये आणि आर्मेनियाच्या सीमेला लागून असेलल्या अझरबैजानचा भाग. जो साऊथ कॉकेशसमध्ये स्ट्रेटेजिक रुपाने संवेदनशील जागी आहे. या भागात कोणताही कन्फर्म हल्ला या भागाच्या सुरक्षेवर परिणाम करुन तणावात भर टाकणार आहे.

भारताचा विरोधक आहे अझरबैजान

अझरबैजान आंतरराष्ट्रीय आघाडीवर पाकिस्तानची तळी उचलत असतो. अझरबैजान, तुर्की आणि पाकिस्तान हे त्रिकोणी आघाडी आहे. काहीच दिवसांपूर्वी अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षाने पाकिस्तानचा दौरा केला होता. कश्मीर प्रश्नी अझरबैजान भारताच्या विरोधात नेहमीच वक्तव्य करत असतो.

Follow Us
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट...
CJP च्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट! ठाकरे गटाचे नेते वांगचुक यांची भेट घेणार
आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने...हेमा मालिनी
Hema Malini | आंदोलन करून काही होणार नाही शांततेच्या मार्गाने... CJP आंदोलनावर हेमा मालिनी यांचं मोठं विधान
मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय;
Big Breaking | मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीत CJPचा मोठा निर्णय; सोनम वांगचुक...
दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
मोठी बातमी! CJP आंदोलनावर दिल्लीत बैठक सुरू; IB प्रमुख, गृहसचिव आणि पोलीस आयुक्त एकाच टेबलावर
अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवलं
मोठी बातमी! अनेक तासांचा गोंधळ... नुसती धावपळ... अखेर पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतर मैदानातून हटवलं
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा..
अधिवेशनात पहिल्याच दिवशी वादळ! CJP च्या आंदोलनामुळे राज्यसभा 5 वेळा स्थगित तर लोकसभा...
दिल्लीपासून राज्यात कुठे कुठे विद्यार्थ्यांचा एल्गार
CJP Protest News | राज्यसभा स्थगित... पण आंदोलन थांबलं नाही! दिल्लीपासून राज्यात कुठे कुठे विद्यार्थ्यांचा एल्गार
वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचं आंदोलन, थेट जिल्हाधिकारी...
Thane | वांगचुक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचं आंदोलन, थेट जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच...
ठाकरे- पवारांच्या पक्षाला माणसं मिळत नसल्याने ते दुसऱ्यांच्या....
Girish Mahajan | ठाकरे- पवारांच्या पक्षाला माणसं मिळत नसल्याने ते दुसऱ्यांच्या आंदोलनात जातात; गिरीश महाजनांचा हल्लाबोल
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक पूर्ण
दिल्लीत मंत्री जे. पे. नड्डा आणि CJP शिष्टमंडळाची 10 मिनिटे बैठक, चर्चेत नेमकं काय घडलं?
CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ.

CJP Parliament March : सोनम वांगचुक यांना सोडा, सीजेपीच्या 3 मागण्या, जेपी नड्डांनी मागितला वेळ

जेपी नड्डा- सीजेपी यांच्यात बैठक, मिळालं पहिलं मोठं आश्वासन; दिल्लीत घडामोडी वाढल्या!.

जेपी नड्डा- सीजेपी यांच्यात बैठक, मिळालं पहिलं मोठं आश्वासन; दिल्लीत घडामोडी वाढल्या!

मोठी बातमी! सरकारचं टेन्शन वाढलं, जे. पी. नड्डा यांच्या घरी नेमकं काय घडलं? आता कॉकरोच जनता पार्टीची सर्वात मोठी घोषणा.

मोठी बातमी! सरकारचं टेन्शन वाढलं, जे. पी. नड्डा यांच्या घरी नेमकं काय घडलं? आता कॉकरोच जनता पार्टीची सर्वात मोठी घोषणा

सर्वात मोठी बातमी! 23 दिवसांचा लढा, नड्डांशी शिष्टमंडळाची भेट होताच सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे.

सर्वात मोठी बातमी! 23 दिवसांचा लढा, नड्डांशी शिष्टमंडळाची भेट होताच सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?.

विरोधकांनी मोदींना घेरलं, 6 वेळा लोकसभा, 5 वेळा राज्यसभा स्थगित, नेमकं काय घडलं?

कल्याण-डोंबिवलीकर वाऱ्यावर, KDMC ची परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प, कामबंदचा फटका.

कल्याण-डोंबिवलीकर वाऱ्यावर, KDMC ची परिवहन सेवा पूर्णपणे ठप्प, कामबंदचा फटका