Smit Machchhar : ज्या स्मित मच्छारने जिवाची बाजी लावून 174 जणांचे प्राण वाचवले, त्या भारतीय वैमानिकाला इस्रायला हा खास पुरस्कार देणार का?
Smit Machchhar : सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश प्रोफेसर योरोम डैंजिगर या समितीचे अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या इस्रायली आणि परदेशी नागरिकांना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. यात दुसऱ्या देशाचे राष्ट्रप्रमुख, समाजिक क्षेत्रातील प्रमुख लोक आणि जगभरातील यहुदी नेत्यांचा त्या मध्ये समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताला कायमच दोन देशांनी साथ दिली आहे. हे दोन्ही देश भारताचे सच्चे मित्र आहेत, एक म्हणजे रशिया आणि दुसरा इस्रायल. काल एक मोठी घटना घडली. त्याने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुबईहून इस्रायलला चाललेलं फ्लायदुबईचा विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न झाला. या विमानात एकूण 174 प्रवासी होते. भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मछारने स्वत:चा जीव धोक्यात घालून हे विमान क्रॅश होण्यापासून वाचवलं. स्मित मछार यांच्या शौर्याची जगभरात चर्चा आहे. अनेक प्रमुख जागतिक नेत्यांनी स्मित मछार यांचं कौतुक केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्मित मछार यांना हिरो ठरवलं आहे. इस्रायल आपल्या सर्वोच्च पुरस्काराने स्मित मछार यांना सन्मानित करणार का? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
आपल्या शौर्याने, सेवेने किंवा अन्य कुठल्या पद्धतीने जे लोक इस्रायल किंवा संपूर्ण मानवतेसाठी असाधारण योगदान देतात त्यांना इस्रायच्या राष्ट्रपतींकडून प्रेसिडेंट मेडल ऑफ ऑनरने सन्मानित केलं जातं. इस्रायलचे नववे राष्ट्रपती मोन पेरेस यांनी या पुरस्काराची सुरुवात केलेली. 2012 मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आलेला. इस्रायलच्या राष्ट्रपतींकडे एक सल्लागार समिती असते, ती या पुरस्कारासाठी नाव सुचवते. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश प्रोफेसर योरोम डैंजिगर या समितीचे अध्यक्ष आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या इस्रायली आणि परदेशी नागरिकांना या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. यात दुसऱ्या देशाचे राष्ट्रप्रमुख, समाजिक क्षेत्रातील प्रमुख लोक आणि जगभरातील यहुदी नेत्यांचा त्या मध्ये समावेश होतो.
अधिकृत घोषणा झालीय का?
सध्या इस्रायलकडून स्मित मछार यांना प्रेसिडेंट मेडल ऑफ ऑनर देण्याची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. इस्रायली राष्ट्रपतींच्या वेबसाइटनुसार हा पुरस्कार फक्त इस्रायली नागरिकांपुरता मर्यादित नाही. परदेशी नागरिकांना सुद्धा हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार्थीला राष्ट्रपती स्वत: विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करतात. 2025 साली या पुरस्कारासाठी 10 नावांची घोषणा झालेली. यात अमेरिकेचे डॉ. मिरियम एडेलसन, जर्मनीचे माथियास डॉप्फनर आणि शेख मुवफ्फक तारीफ सह अन्य प्रमुख व्यक्ती होत्या.
म्हणून तुम्ही कायमस्वरुपी इस्रायलचे सरकारी पाहुणे बनत नाही
प्रेसिडेंट मेडल ऑफ ऑनर पुरस्कार मिळाला म्हणून तुम्ही कायमस्वरुपी इस्रायलचे सरकारी पाहुणे बनत नाही. अशा कुठल्याही सुविधेचा उल्लेख नाहीय. इस्रायलमध्ये नागरिक वीरता पुरस्कार सुद्धा दिला जातो. असामान्य शौर्य दाखवून कोणाचा जीव वाचवणाऱ्याला या पुरस्काराने सन्मानित केलं जातं. हा पुरस्कार इस्रायली नागरिकांसाठी आहे. नेतन्याहू यांनी स्मित मछार यांना हिरो म्हणणं हेच सध्याच्या घडीला इस्रायलकडून आलेलं सर्वात मोठं वक्तव्य आहे. सरकारी मेडल किंवा सरकारी पाहुणा सारखी कुठलीही घोषणा झालेली नाही.