इराणचा महाविनाश, इस्त्रायलचा थेट तेलाच्या ठिकाणांवर…गुपचूप केलेल्या हल्ल्याने भयंकर घडलं!

इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला आहे. जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायूच्या ठिकाणावर इस्त्रायलने बॉम्बगोळे डागले आहेत. इराणसाठी हा परिसर खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता इराण काय उत्तर देणार, याकडे जगाचे लक्ष्य लागले आहे.

इराणचा महाविनाश, इस्त्रायलचा थेट तेलाच्या ठिकाणांवर...गुपचूप केलेल्या हल्ल्याने भयंकर घडलं!
iran oil complex
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 06, 2026 | 9:00 PM

Israel Attack On Iran : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 7 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. इराणने 7 एप्रिलपर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीचा जलमार्ग चालू केला नाही, तर आम्ही इराणला उद्ध्वस्त करू, अशी उघड धमकीच ट्रम्प यांनी दिलेली आहे. परंतु इराणने मात्र आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही, असे खडसावून सांगितले आहे. दरम्यान, आता 7 एप्रिल रोजी अमेरिका इराणवर कशा प्रकारे हल्ले करणार? याची भीती संपूर्ण जगाला लागली आहे. त्याआधीच आता इस्त्रायलाने रौद्र रुप धारण करत इराणवर सर्वात भयंकर हल्ले केले आहेत. इस्त्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या तेल केंद्राला लक्ष्य केलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले असून इराणही जशास तसे प्रत्युत्तर देण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पार्स पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये स्फोटाचे अनेक आवाज

मिळालेल्या माहितीनुसार इस्त्रायलने 6 एप्रिल रोजी इराणच्या साउथ पार्स पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सवर हल्ला केला आहे. हे ठिकाणी इराणचा सर्वाधिक मोठा तेलाचा प्लॅन्ट आहे. फार्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी इस्त्रायलने हल्ला केला ते ठिकाण इराणच्या असलुयेह या भागात आहे. या वृत्तानुसार इस्त्रायलच्या हल्ल्यानंतर साउथ पार्स पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्ये स्फोटाचे अनेक आवाज आले होते. या हल्ल्यानंतर आम्ही इस्त्रायलला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे.

याआधीही इस्त्रायलने याच ठिकाणावर हल्ला केला होता. त्यावेळच्या हल्ल्यानंतर मात्र अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती. परंतु यावेळी अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या 7 एप्रिलच्या हल्ल्याआधीच इस्त्रायलने इराणला लक्ष्य केलं आहे.

पार्स गॅसफिल्ड इराणसाठी का महत्त्वाची?

दरम्यान, हे युद्ध थांबावे यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यासोबत इजिप्त, तुर्की आणि पाकिस्तान हे चर्चा करत आहेत. शस्त्रसंधीची चर्चा करण्याआधी सध्या तात्पुरता युद्धविराम करण्याचा पर्याय या देशांनी इराणपुढे ठेवला होता. परंतु इराणने मात्र हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. साऊध पार्स गॅसफिल्ड ही इराणसाठी खूप महत्त्वाची आहे. हा परिसर जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा स्त्रोत आहे. येथे संपूर्ण जागाला 18 वर्षेल पुरेल एवढा नैसर्गिक वायू आहे. त्यामुळे आता इराण नेमकं काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us