AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी? भारताचा दोस्त असलेल्या नेतन्याहू यांच्या सत्तेला सुरुंग? धक्कादायक इलेक्शन सर्व्हे काय?

इस्रायलच्या आगामी निवडणुकीपूर्वी आलेल्या ओपिनियन पोलने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची चिंता वाढवली आहे. माजी लष्करप्रमुख गादी आइजनकोट यांना पंतप्रधान पदासाठी अधिक पसंती मिळत असून, त्यांच्या यशार पार्टीला यश मिळत आहे. सर्व्हेनुसार, विरोधी पक्षांना बहुमत मिळण्याची शक्यता असून, नेतन्याहूंना सत्ता गमवावी लागू शकते. या धक्कादायक निकालामुळे इस्रायलच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रचंड मोठ्या राजकीय घडामोडी? भारताचा दोस्त असलेल्या नेतन्याहू यांच्या सत्तेला सुरुंग? धक्कादायक इलेक्शन सर्व्हे काय?
NetanyahuImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 08, 2026 | 11:34 AM
Share

इस्रायलच्या सर्वसाधारण निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना धडकी भरवणारी बातमी आहे. निवडणुकीच्या सर्व्हेने नेतन्याहू यांची चिंता वाढवली आहे. सोमवारी या निवडणुकीचा ओपिनियन पोल आला आहे. या पोलमध्ये इस्रायलचे माजी लष्कर प्रमुख गादी आइजनकोट यांच्या याशार पार्टीला अभूतपूर्व यश मिळताना दिसत आहे. सर्व्हेमध्ये नेत्यनाहू यांच्या विजय आणि परायजयाचे मोठे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायली नागरिकांचा हा कौल युद्धविरोधात असल्याचंही सांगितलं जात आहे.

या सर्व्हेत याशार पार्टीला 25 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीला 21 जागा मिळताना दिसत आहेत. इस्रायलच्या मार्केट रिसर्च आणि पब्लिक ओपिनियन पोलिंग संस्था मिडगॅमने हा सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे चॅनल 12 साठी केला आहे. मागच्या सर्व्हेच्या तुलनेत याशार पार्टीला यावेळी एका सीटचा फायदा होताना दिसत आहे. तर नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीच्या दोन जागा कमी झाल्या आहेत. इस्रायलची संसद म्हणजे नेसेटची सदस्य संख्या एकूण 120 इतकी आहे.

विरोधकांना लॉटरी

या सर्व्हेनुसार विरोधकांना लॉटरी लागताना दिसत आहे. माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या टुगेदर पार्टीला 13 जागा मिळताना दिसत आहेत. वास्तवात सर्व्हेतील हा सर्वात कमी आकडा आहे. मात्र, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत टुगेदर पार्टीच्या दोन जागा वाढताना दिसत आहेत. यायर गोलान यांच्या नेतृत्वातील डेमोक्रेट्स पार्टीला 11 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एव्हिगडोर लिबरमॅन यांच्या इस्रायल बेतेनू पार्टीला 8 जागा मिळण्याची शक्यता आहे. यूनायटेड टोरा ज्यू धर्म पार्टीला सुद्धा 8 जागा मिळताना दिसत आहेत. आर्येह डेरी यांच्या शास पार्टीला 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

बेजलेल स्मोट्रिच आणि मोशे फेइग्लिनच्या नेतृत्वाताली राइट विंग धार्मिक जियोनिज्म आणि जेहूत आघाडीला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे. ओफर विंटर यांच्या अमचा इस्रायल पार्टीला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागणार आहे.

इस्रायल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, अरब पक्षांमध्ये ज्वॉइंट लिस्टला सात तर मंसूर अब्बास यांच्या यूनायटेड अरब लिस्टला 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर बेनी गैंट्ज यांच्या ब्लू अँड व्हाइट ततसे अवी माओज यांच्या नोआम इस्रायलसहीत अनेक पक्ष 3.25 टक्के निवडणूक थ्रेशोल्ड पार करतानाही दिसत नाहीये.

पंतप्रधान पदाच्या रेसमधून मागे

दरम्यान, विरोधी पक्षांना एकूण 68 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यात 57 जागा ज्यू पक्षांना आणि 11 जागा अरब पक्षांना मिळणार आहेत. नेतन्याहू यांच्या गटाला 52 जागा मिळताना दिसत आहेत. स्मोट्रिच आणि विंटर यांचे पक्ष निवडणूक थ्रेशोल्ड पार करणार असल्याने नेतन्याहू यांच्या गोटात दोन जागांची वाढ होणार आहे.

इस्रायलमध्ये सरकार बनवण्यासाठी 120 जागांपैकी कमीत कमी 61 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे सर्व्हेतील आकडे पाहिल्यास यंदाची सत्ता विरोधकांच्या हातात जाणार असल्याचं चित्र आहे. नेतन्याहू यांना सत्तेतून बाहेर जावं लागणार असाच हा सर्व्हे आहे.

एवढंच नव्हे तर पंतप्रधान पदाच्या रेसमधुन नेतन्याहू मागे पडताना दिसत आहे. पंतप्रधान पदासाठी 42 टक्के मतदारांनी आइजनकोट यांना पहिली पसंती दिली आहे. आइजनकोट हेच उपयुक्त पंतप्रधान असल्याचं मतदारांना म्हटलं आहे. तर नेतन्याहू यांना पंतप्रधान पदासाठी केवळ 35 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. म्हणजेच पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नेतन्याहू हे 7 टक्क्यांनी मागे आहेत. येत्या 27 ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये सर्वसाधारण निवडणुका होणार आहेत. नेतन्याहू यांची झोप उडवणारा हा सर्व्हे असल्याचं म्हटलं जात आहे.

Follow Us
नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut | नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान आहेत का? संजय राऊतांचा थेट सवाल; पुढे म्हणाले, देशाचे कॅबिनेट...
श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले
Sanjay Gaikwad | श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली! म्हणाले...
रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची...
Maratha Reservation | रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर खलबतं! मराठा आरक्षणावर सरकारची महत्त्वाची बैठक; फडणवीसांसह...
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...