AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्ष, 100 रॉकेट डागली, 20 नागरिकांचा बळी

इस्रायलने संयम बाळगावा. तसेच ऐतिहासिक पवित्र स्थळांचा आदर करण्यात यावा, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले. | israel

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्ष, 100 रॉकेट डागली, 20 नागरिकांचा बळी
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: May 11, 2021 | 9:47 AM
Share

जेरुसलेम: इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा संघर्षाला तोंड फुटले असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले सुरु झाले आहेत. सोमवारी हमासने इस्रायलच्या (Israel) दिशेने 100 क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्याला इस्रायलकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये या नऊ लहान मुलांसह 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. (Jerusalem violence deadly israel air strike hit gaza after rokcet attacks from hamas)

गेल्या काही वर्षांमध्ये एकाच दिवसात इतका रक्तपात झाल्याची ही पहिलीच घटना आहे, असे पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. पॅलेस्टाईनने हल्ला केल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले, असे इस्रायलचे म्हणणे आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र संघटनेने आपातकालीन बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत संयुक्त राष्ट्रसंघटनेने इस्रायलला काही सूचना केल्या. इस्रायलने संयम बाळगावा. तसेच ऐतिहासिक पवित्र स्थळांचा आदर करण्यात यावा, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले.

इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये संघर्ष

जेरूसलेमच्या अक्सा मशिदीबाहेर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. यामध्ये शेकडो लोक जखमी झाले आहेत. त्यानंतर हमास संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरु केली. इस्रायलने जेरूसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांना घरे खाली करण्यास सांगितले आहे. जेणेकरून याठिकाणी यहुदी नागरिकांना राहता येईल. यावरुन पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलमध्ये सातत्याने निदर्शने करत आहेत.

नेमका वाद काय आहे?

इस्रायलने 1967 साली मध्यपूर्वेतील युद्धानंतर जेरूसलेम ताब्यात घेतले होते. त्यानंतर इस्रायलयने हा परिसर यहुदी लोकांचा देश म्हणून घोषित केल होता. तेव्हापासून पॅलेस्टिनी नागरिक इस्रायलविरोधात संघर्ष करत आहेत. पॅलेस्टाईन स्वतंत्र होईल तेव्हा जेरुसलेम ही आमची राजधानी असेल, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, आता इस्रायलने जेरुसलेममध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांनाच बाहेर काढायला सुरुवात केली आहे.

इतर बातम्या:

अमेरिकेचा मोठा निर्णय, कोरोना लसींविषयी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाला पाठिंबा

इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्यावर 13 मिसाईल हल्ले, बायडन सरकारची रणनीती काय?

अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला, खबरदारीसाठी आणीबाणी लागू, नेमकं काय घडलं?

(Jerusalem violence deadly israel air strike hit gaza after rokcet attacks from hamas)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...