AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला, खबरदारीसाठी आणीबाणी लागू, नेमकं काय घडलं?

अमेरिकेमध्ये कोलोनियल पाईपलाईन कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे. US cyber attack colonial pipeline

अमेरिकेवर मोठा सायबर हल्ला, खबरदारीसाठी आणीबाणी लागू, नेमकं काय घडलं?
अमेरिकेवर सायबर हल्ला
| Updated on: May 10, 2021 | 11:26 AM
Share

वॉशिंग्टन: अमेरिकेमध्ये कोलोनियल पाईपलाईन कंपनीवर सायबर हल्ला झाल्यानं प्रादेशिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे. अमेरिकेतील मोठ्या इंधन वाहतूक करणाऱ्या पाईपलाईन यंत्रणेवर रॅन्समवेअर सायबर हल्ला झाल्यानं तातडीनं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय अमेरिकन सरकारनं घेतला आहे. (US Declare Regional Emergency after fuel pipeline cyber attack on colonial pipeline for money)

पैशांसाठी सायबर हल्ला

कोलोनियल पाईपलाईनमधून दररोज 25 लाख बॅरल तेल वाहतूक केली जाते. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील राज्यांना या पाईपलाईन द्वारे 45 टक्के इंधन पुरवठा केला जातो. हॅकर्सनं शुक्रवारी सायबर हल्ला केला.त्यानंतर पाईपालईनद्वारे होणारी गॅस वाहतूक थांबली आहे. रॅन्समवेअरद्वारे सायबर हल्ला डार्कसाईडच्या हॅकर्सनं केल्याची प्राथमिक माहिती आहे. हॅकर्सनी कोलोनियल पाईपलाईन कंपनीचा 100 जीबी डाटावर नियंत्रण मिळवलं आहे. यानंतर त्यांनी काही कॉम्प्युटर लॉक केले असून काही डाटा लॉक केला आहे. डाटा परत करण्यासाठी हॅकर्सनी अमेरिकेकडे पैशाची मागणी केली आहे.

आणीबाणी का लागू करण्यात आली?

कोलोनियल पाईपलाईनवर सायबर हल्ला झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. तेल पुरवठा जवळपास थांबल्यात जमा आहे. इंधन तेलाची कमतरता जाणवू नये म्हणून अमेरिकेत प्रादेशिक आणीबाणी लागू करण्यात आली आहे. गॅसोलिन, डिझेल, जेट फ्यूल आणि पेट्रोलियम पदार्थांची रस्तेमार्गे वाहतूक करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र , इंधनाची कमतरता जाणवू नये म्हणून तातडीनं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सायबर हल्ल्याचा किती राज्यांवर परिणाम?

कोलोनियल पाईपलाईन वर करण्यात आलेल्या साबर हल्ल्याचा परिणाम अनेक राज्यांवर झालेला पाहायला मिळाला. अल्बामा, अर्कन्सास, कोलंबिया, फ्लोरिडा, जॉर्जिया, केंच्युकी, मिसीसीपी, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, नॉर्थ कॅरोलिना, पेन्सिलविनिया, साऊथ कॅरोलिना, टेक्सास आणि इतर काही राज्यांवर याचा परिणाम झाला आहे. अमेरिकन प्रशासनानं प्रादेशिक आणीबाणी जारी करुन इंधन तेलाची वाहतूक रस्तेमार्गे करण्याचे आदेश दिले आहेत. कोलोनियल पाईपलाईन कंपनींनं पर्यायी पाईपलाईन सुरु केली असली तरी मुख्य पाईपलाईनवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेलं आहे.

सायबर हल्ला कसा झाला?

कोलोनियल कंपनीचं कर्मचारी अभियंते कोरोना संसर्ग सुरु असल्यानं घरुन काम करत आहेत. हॅकर्सनी याचा फायदा घेत डेस्कटॉप शेअरिंगचा डाटा खरेदी करुन त्यानंतर त्याद्वारे सायबर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मंगळवारपर्यंत कोलोनियल पाईपलाईनाची सेवा पूर्ववत झाली नाहीतर अमेरिकेवर याचा मोठा परिणाम जाणवू शकतो.

सायबर हल्ल्याचा परिणाम जाणवू लागला असून अमेरिकेत गॅसचे दर वाढले आहेत. या हल्ल्यामुळं इंधन तेलाच्या किमती वाढण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

संबंधित बातम्या:

अमेरिकेचा मोठा निर्णय, कोरोना लसींविषयी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाला पाठिंबा

इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्यावर 13 मिसाईल हल्ले, बायडन सरकारची रणनीती काय?

(US Declare Regional Emergency after fuel pipeline cyber attack on colonial pipeline for money)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.