AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russian Indian Student: रशियामध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला, कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घुसून… धक्कादायक प्रकरण समोर

Russian Indian Student: रशिया शहरातील उफा येथील एका वैद्यकीय कॉलेजमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे. आता नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

Russian Indian Student: रशियामध्ये चार भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला, कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये घुसून... धक्कादायक प्रकरण समोर
Russian Indian Student attackImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 08, 2026 | 9:04 AM
Share

रशियाच्या बश्कोर्तोस्तान गणराज्यातील उफा शहरात एका मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये चाकूने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थी सहित अनेक जण जखमी झाले आहेत. भारतीय दूतावासाने शनिवार (७ फेब्रुवारी २०२६) रात्री या घटनेची पुष्टी केली आहे आणि सांगितले आहे की सर्व जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत. या हल्ल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. आता नेमकं काय झालं वाचा…

भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की, उफामध्ये एक दुर्दैवी हल्ल्याची घटना घडली आहे, ज्यात चार भारतीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. दूतावासाने सांगितले की, ते रशियाच्या स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहेत आणि कझान येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी उफाकडे रवाना झाले आहेत, जेणेकरून जखमी विद्यार्थ्यांना शक्य तितकी मदत मिळेल.

हल्ला कसा झाला?

PTIने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (७ फेब्रुवारी २०२६) एक १५ वर्षीय किशोर, उफा येथील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या परिसरात घुसला. आरोपी थेट छात्रावास (डॉर्मिटरी)मध्ये पोहोचला आणि तेथे उपस्थित विद्यार्थ्यांवर अचानक त्याने चाकूने हल्ला केला. हल्ला इतका अचानक होता की विद्यार्थ्याला काही कळालेही नाही. रशियाच्या गृह मंत्रालयानुसार, आरोपीने अनेक विद्यार्थ्यांना चाकू मारले. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने दोन पोलिसांवरही हल्ला केला. अटकेचा विरोध करताना आरोपी स्वतःही जखमी झाला. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्या मेजर जनरल इरीना वोल्क यांनी सांगितले की, आरोपीला पकडताना पोलिस जखमी झाले आहेत आणि हल्लेखोराने स्वतःलाही इजा पोहोचवली आहे.

जखमींची स्थिती कशी आहे?

रशियाच्या आरोग्य मंत्रालयानुसार, हल्ल्यात जखमी झालेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी एकाची स्थिती गंभीर सांगितली जात आहे. तर, हल्लेखोर किशोरालाही बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याची स्थितीही गंभीर आहे.

तपासात समोर आली महत्त्वाची माहिती

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी एका प्रतिबंधित नियो-नाझी संघटनेशी संबंधित होता. हल्ल्यादरम्यान तो राष्ट्रवादी घोषणा देत होता. तपास यंत्रणांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे आणि प्रत्येक पैलूची तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर युनिव्हर्सिटी आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने सांगितले आहे की, ते परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत आणि भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा त्यांचे प्राधान्य आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?