जल्लाद पदाची भरती, 2 जागांसाठी 100 जणांचे अर्ज

कोलंबो : कैद्यांना फाशी देणाऱ्या जल्लादचं काम कुणालाही नको असतं. या पदासाठी भरती निघाली, तर कुणी फिरकणार सुद्धा नाही. मात्र श्रीलंकेत काहीसं उलट चित्र दिसून आलं. जल्लादच्या दोन पदांसाठी तब्बल 100 जणांनी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, श्रीलंकेत जल्लाद पदासाठी ज्या 100 जणांनी अर्ज केले आहेत, त्यात एक अमेरिकन नागरिक सुद्धा आहे. 25 फेब्रुवारी ही …

जल्लाद पदाची भरती, 2 जागांसाठी 100 जणांचे अर्ज

कोलंबो : कैद्यांना फाशी देणाऱ्या जल्लादचं काम कुणालाही नको असतं. या पदासाठी भरती निघाली, तर कुणी फिरकणार सुद्धा नाही. मात्र श्रीलंकेत काहीसं उलट चित्र दिसून आलं. जल्लादच्या दोन पदांसाठी तब्बल 100 जणांनी अर्ज केला आहे. विशेष म्हणजे, श्रीलंकेत जल्लाद पदासाठी ज्या 100 जणांनी अर्ज केले आहेत, त्यात एक अमेरिकन नागरिक सुद्धा आहे. 25 फेब्रुवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.

अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांना श्रीलंकेत लवकरच फाशी दिली जाणार आहे. त्यासाठी जल्लादांची भरती सुरु करण्यात आली आहे. अर्जदारांची मुलाखत घेऊन त्यांची भरती केली जात आहे. ज्या 100 जणांनी जल्लाद होण्यासाठी अर्ज केा आहे, त्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव नाव किंवा कोणतीही माहिती जाहीर केली जाणार नाही.

दोषी गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी श्रीलंकेत कायदा आहे. मात्र 1976 पासून श्रीलंकेत कुणालाही फाशी दिली गेली नाही. गेल्या पाच वर्षांपासून तर श्रीलंकेतील कुठल्याच तुरुंगात जल्लादाची नेमणूक करण्यात आली नाही. गेल्या वर्षी एका जल्लादाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र तो नोकरीवर आलाच नाही.

श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती की, येत्या दोन महिन्यात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना फासावर लटकवेन.

दुसरीकडे, श्रीलंकेच्या न्याय मंत्रालयाने आधीच घोषणा केली आहे की, अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी 48 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. यातील 30 जणांनी पुढील कोर्टाचे दार ठोठावले आहेत. मात्र 18 जणांना फाशी निश्चित आहे.

श्रीलंकेत 2004 पासून बलात्कार, अंमली पदार्थांची तस्करी आणि हत्या हे सर्वात मोठे गुन्हे मानले जातात, मात्र या सगळ्यांची शिक्षा जन्मठेपच ठेवण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *