AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरातील 150 टॉप मॉडेल, गुप्तरोगांची चाचणी करुन प्रवेश, सौदीच्या प्रिन्सच्या मालदीवमधील पार्टीची जोरदार चर्चा

नव्याने प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात सौदी प्रिन्स यांच्या एका खासगी पार्टीविषयी मोठा दावा करण्यात आला आहे (Mohammed Bin Salman secret parties in maldives claim in new book Blood and Oil).

जगभरातील 150 टॉप मॉडेल, गुप्तरोगांची चाचणी करुन प्रवेश, सौदीच्या प्रिन्सच्या मालदीवमधील पार्टीची जोरदार चर्चा
| Updated on: Oct 12, 2020 | 9:28 PM
Share

रियाद : पत्रकार जमाल खशोगी यांची हत्‍या असो की शाही परिवारातील सदस्यांविरोधात कारवाई सौदी अरबचे प्रिन्स मोहम्‍मद बिन सलमान नेहमीच वादात सापडलेले पाहायला मिळाले. आता नव्याने प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात सौदी प्रिन्स यांच्या एका खासगी पार्टीविषयी मोठा दावा करण्यात आला आहे (Mohammed Bin Salman secret parties in maldives claim in new book Blood and Oil). यानुसार, “प्रिन्स सलमान यांनी मालदीवच्या एका आयर्लंडवर भव्य पार्टीचं आयोजन केलं होतं. यात जगभरातील अनेक देशांमधील टॉप मॉडेल्स आणि सर्वात महागडे डीजे यांना बोलावण्यात आलं होतं. या पार्टीसाठी संपूर्ण बेट बूक करण्यात आलं होतं.”

‘ब्‍लड अँड ऑईल: मोहम्‍मद बिन सलमान रूदलेस क्‍वेस्‍ट फॉर ग्‍लोबल पॉवर’ (Blood and Oil: Mohammed Bin Salman’s Ruthless Quest for Global Power) या पुस्तकात दावा केला आहे की, “ही पार्टी 2015 च्या उन्हाळ्यात आयोजित करण्यात आली होती. यात प्रिन्स सलमान यांचे काही मोजके जवळचे पाहुणे देखील सहभागी झाले होते. या पाहुण्यांना खुश करण्यासाठी ब्राझील, रशिया आणि जगभरातून 150 मॉडेल्सला आणण्यात आलं होतं. बेटावर प्रवेश करण्याआधी या सर्व मॉडेल्सच्या सेक्‍सुअली ट्रांसमिटेड डिजीज (STD) म्हणजेच गुप्तरोग चाचणी घेण्यात आल्या होत्या.”

अनेक प्रसिद्ध रॅपर आणि डीजे पार्टीत सहभागी

या पार्टीची शोभा वाढवण्यासाठी मियामीच्या प्रसिद्ध रॅपर आणि कोरियाच्या पॉप स्टारला देखील बोलावण्यात आलं होतं. प्रिन्स सलमान स्वतः आपल्या आवडीची गाणी वाजवण्यास सांगत होते. पाहुणे रात्रभर पार्टी करत आणि दिवसभर झोपून आराम करत होते. प्रिन्सने 50 कोटी डॉलरमध्ये एक पंचतारांकीत यॉच देखील बूक केले होते. यात दोन हॅलीपॅड आणि थिएटर आणि स्विमींग पूलसह आतून समुद्र पाहण्याची व्यवस्थ करण्यात आली होती.

एका महिन्यासाठी संपूर्ण बेट बूक

प्रिन्स सलमानने या ठिकाणी जवळपास एक महिने पार्टी करण्याचं ठरवलं होतं, मात्र स्थानिक वृत्तपत्रांनी या पार्टीबाबत खुलासा केल्यावर त्यांना परदेशी मॉडेलसह हे बेट सोडावं लागलं. प्रिन्सने संपूर्ण बेटावर 300 कर्मचारी, 48 प्रायव्हेट व्हिला आणि बर्फाचा पाऊस पाडण्याची मशिन भाड्याने घेतले होते. पाहुण्यांच्या प्रायव्हसीसाठी या पार्टीत फोनवरही बंदी होती. पाहुण्यांना केवळ नोकिया 3310 फोन वापरण्यास परवानगी होती.

संबंधित बातम्या :

पाकिस्तानला मंत्र्याचं वक्तव्य भोवलं, सौदी अरबच्या निर्णयाने पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर

सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला, भीषण अग्नितांडव

वयाच्या 10 व्या वर्षी सौदी सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या मुलाला फाशी?

Mohammed Bin Salman secret parties in maldives claim in new book Blood and Oil

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.