सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला, भीषण अग्नितांडव

सौदी अरेबियातील सरकारी मीडियाने गृहमंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरामकोच्या दोन तेल प्लांटवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) करण्यात आला. हे दोन प्लांट अब्कॅक आणि खुरैस भागात आहेत. जवळपास दहाच्या आसपास ड्रोन पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय.

सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला, भीषण अग्नितांडव
सचिन पाटील

| Edited By:

Sep 14, 2019 | 7:28 PM

रियाध, सौदी : जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) झालाय. सौदी अरेबियातील या हल्ल्यानंतर भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. हुती या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. सौदी अरेबियातील सरकारी मीडियाने गृहमंत्रालयाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरामकोच्या दोन तेल प्लांटवर ड्रोन हल्ला (Saudi Aramco Drone Attack) करण्यात आला. हे दोन प्लांट अब्कॅक आणि खुरैस भागात आहेत. जवळपास दहाच्या आसपास ड्रोन पाठवण्यात आल्याचं बोललं जातंय.

अरामकोमध्ये लागलेल्या आगीवर स्थानिक यंत्रणांकडून तातडीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. या हल्ल्यातील जीवितहानीबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर एक व्हिडीओ समोर आला, ज्यातून आगीची भीषणता स्पष्ट दिसून येते.

https://twitter.com/QanatAhrar/status/1172775191694512128

या हल्ल्यानंतर सौदी अरामको आणि या कंपनीचे विविध देशांसोबत असलेल्या कराराबाबत तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौदी अरामको ही सौदी अरेबियाची राष्ट्रीय तेल कंपनी असून महसुलाच्या बाबतीत जगातील सर्वात मोठी तेल कंपनी आहे.

काही महिन्यांपूर्वीच फुटीरतावादी संघटनांनी सौदी अरेबियातील अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र डागले होते. हुती या संघटनेने काही दिवसांपूर्वी अरामकोच्या प्राकृतिक गॅस केंद्रावरही हल्ला केला होता. या कंपनीवर कायम दहशतवादी हल्ल्याचं सावट असतं. 2006 मध्ये अलकायदा या दहशतवादी संघटनेकडून आत्मघातकी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता, जो अयशस्वी ठरला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें