ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित रॅपर निप्से हसलची गोळ्या घालून हत्या

लॉस एंजेलिस : अमेरिकी रॅपर निप्से हसलची त्याच्या कपड्यांच्या दुकानाजवळ गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. सीएनएन या वृत्तवाहिनीने लॉस एंजेलिस पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितले आहे, की रविवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी झालेल्या या गोळीबारात अन्य दोघेजणही जखमी झाले आहेत. रॅपर निप्सेचे स्लॉसन अॅव्हेन्यू आणि …

ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकित रॅपर निप्से हसलची गोळ्या घालून हत्या

लॉस एंजेलिस : अमेरिकी रॅपर निप्से हसलची त्याच्या कपड्यांच्या दुकानाजवळ गोळी घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. स्थानिक पोलिसांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे. सीएनएन या वृत्तवाहिनीने लॉस एंजेलिस पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितले आहे, की रविवारी दुपारी 3 वाजून 20 मिनिटांनी झालेल्या या गोळीबारात अन्य दोघेजणही जखमी झाले आहेत.

रॅपर निप्सेचे स्लॉसन अॅव्हेन्यू आणि क्रेन्शॉ बुलेवार्ड परिसरात दुकान होते. येथेच ही घटना घडली. संशयितांची कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ग्रॅमी अॅवार्डसाठी नामांकित झालेल्या रॅपर निप्से हसलचा ट्विटरवरील शेवटचा संदेश, “शक्तिशाली शत्रू असणं एक आशिर्वाद आहे”, असा होता. 2010 मध्ये हसलने ‘ऑल मनी इन’ या कंपनीची स्थापना केली. त्याने या कंपनीची सुरुवात आपल्या 5 व्या मिक्सटेप ‘द मॅराथॉन’च्या प्रकाशनासोबत केली होती. हसलने अनेक यशस्वी कलाकारांसोबत काम केले. यात केंड्रिक लेमर ड्रेक, वाईजी, टाय डोलो साइन, मीक मिल आणि यंग ठग याचा समावेश आहे.

हसलच्या मृत्यूच्या बातमीनंतर अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर व्यक्त होत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. पॉपस्टार रिहानाने ट्विटरवर लिहिले, “या घटनेने माझा थरकाप उडाला आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या नातेवाईकांनाही सांत्वन. तुमच्यासोबत असे झाले याचे मला खूप दुःख आहे.” रॅपर आइस क्यूबने ट्विट केले, “माझ्या मित्राच्या जाण्याने निराश आहे.” हसलसोबत काम केलेल्या ड्रेकने इंस्टाग्रामवर लिहिले, ‘अनेक वर्षांनंतर एवढ्यातच हसनला भेटलो. दोघांमध्ये एका नव्या गाण्यावर काम करण्याबद्दल चर्चाही झाली होती.’

पाहा व्हिडीओ:

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *