AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NASA: 53 वर्षात पहिल्यांदा मानवाने चंद्राचा हा भाग पाहिला, आर्टेमिस II मोहिमेने चंद्राचा तो फोटाे पाठवला

नासाच्या आर्टेमिस II मोहिमेतील अंतराळवीरांना चंद्राचा नवा फोटो पाठवला आहे. चंद्राचा हा भाग कधीच पृथ्वीवरुन दिसत नाही. ५३ वर्षानंतर मानव पुन्हा चंद्राच्या जवळ पोहचणार आहे.

NASA: 53 वर्षात पहिल्यांदा मानवाने चंद्राचा हा भाग पाहिला, आर्टेमिस II मोहिमेने चंद्राचा तो फोटाे पाठवला
चंद्राची कधीही न दिसणारी बाजू
| Updated on: Apr 05, 2026 | 7:36 PM
Share

नासाने चंद्रावर पुन्हा मोहिम सुरु केली आहे. नासाच्या चंद्रावरील आर्टेमिस II मोहिमेने आता जगासमोर एक खास फोटो शेअर केला आहे. नासाने रविवारी ( ५ एप्रिल २०२६ ) चंद्राचा नवा फोटो शेअर केला आहे. हा फोटो या मोहिमेतील अंतराळवीरांना काढला आहे. या फोटोचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोटो चंद्राचा असा भाग दिसत आहे. जो मानवाने कधी पूर्णपणे पाहिलेला नव्हता. या फोटोत चंद्राच्या कडेला एक मोठे क्षेत्र दिसत आहे, ज्यास ओरिएंटल बेसिन म्हटले जाते. नासाने सांगितले की पहिल्यांदा असे झाले आहे की चंद्राच्या या भागाला मानवी डोळ्यांनी पहिल्यांदा पाहिले आहे. या आधी ही जागा पूर्णपणे कधी पाहायला मिळाली नव्हती.

या मोहिमेवर चार अंतराळवीर गेले आहेत. यात तीन अमेरिकेतील आहेत आणि एक कॅनडामधील आहे. कॅनाडच्या जेरेमी हॅनसेन आणि अमेरिकेच्या व्हीक्टर ग्लोव्हर, रीड व्हाईसमॅन आणि क्रिस्टीना कोच या अंतराळ मोहिमेवर गेले आहेत. हे अंतराळवीर ओरियन नावाच्या स्पेसक्राफ्टमध्ये सवार झाले आहेत, जे सोमवारपर्यंत ( ६ एप्रिल २०२६ ) आपल्या ठरलेल्या मार्गाने पुढे जात आहे. ही मोहिम यासाठी खास आहे कारण १९७२ सालच्या अपोलो १७ मोहिमेनंतर पहिल्यांदा मानव चंद्राच्या मोहिमेवर गेला आहे. या मोहिमेमुळे चंद्राच्या मोहिमेवर जाणाऱ्या क्रिस्टीना कोच पहिल्या महिला अंतराळवीर बनणार आहेत. तर व्हीक्टर ग्लोवर पहिले अश्वेत अंतराळवीर होतील जे या मोहिमेचा भाग बनले आहेत.

आर्टेमिस II मोहिमेचा मुख्य उद्देश्य काय?

आर्टेमिस II मोहिमेचा मुख्य उद्देश्य चंद्राच्या त्या भागाची माहिती आणि फोटो घेणे आहे जो भाग पृथ्वीवरुन कधीच दिसलेला नाही. यास चंद्राची दूरवरील बाजू म्हटले जाते. ही मोहिम नासासाठी आधीच्या Apollo मोहिमानंतरचे नवे पाऊल आहे. ज्याद्वारे पुढील मानवी मोहिमांची तयारी केली जाणार आहे. हे अंतराळ याने पृथ्वीपासून सुमारे २,५२,००० मैल म्हणजे सुमारे ४ लाख किलोमीटर दूरपर्यंत जाणार आहे. हे चंद्राला वळसा घालून पुन्हा पृथ्वीवर येणार आहे, परंतू चंद्रावर उतरणार तर नाहीच, शिवाय त्याच्या कक्षेतही प्रवेश करणार नाही.

ही मोहिमे आतापर्यंत मानवाने कापलेल्या अंतरापेक्षा जास्त अंतराची ठरणार आहे. हा रेकॉर्ड सध्या अपोलो १३ मोहिमेकडे आहे. बातमीनुसार रविवारपर्यंत या यानाने अर्ध्याहून अधिक अंतर कापलेले असेल. ही मोहिम सुमारे १० दिवसाची असून १० एप्रिल रोजी प्रशांत महासागरात याने उतरल्यानंतर ही मोहीम संपणार आहे.ही मोहिम नासाच्या मोठ्या योजनेचे पहिले पाऊल आहे. मानव भविष्यात चंद्रावर अधिक काळ राहू शकतो का? याचा अभ्यास केला जात आहे. साल २०२८ पर्यंत चंद्राच्या दक्षिण गोलार्धात अंतराळवीरांना उतरवण्याचे नासाचे लक्ष्य आहे.

येथे पोस्ट पाहा –

मोहिमेची सुरुवात चांगली, पण

या मोहिमेची सुरुवात चांगली झाली, परंतू काही वेळानंतर एक छोटी समस्या समोर आली ओरियन यानाचे टॉयलेट ठीक काम करत नव्हते. जोपर्यंत ते दुरुस्त होत नाही तोपर्यंत अंतराळवीरांना बॅकअप म्हणून वापर होणाऱ्या एका खास बॅगचा उपयोग करावा लागत होता. इंजिनियर्सच्या मते सिस्टीममध्ये बर्फ साठल्याने त्यामुळे तरल कचरा बाहेर जाऊ शकत नाही.मात्र, ठोस स्वरुपाच्या कचऱ्यासाठी टॉयलेट अजूनही काम करत आहे. सिस्टीम पूर्णपणे नीट नाही,परंतू वापरण्या योगी आहे आणि सर्व अंतराळवीर सुखरुप आहेत असे मोहिमेचे प्रमुख जॉन हनीकट यांनी म्हटले आहे.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.