AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flood: मी 10 सेकंदाने वाचले नाहीतर… विद्यार्थीनीने सांगितला मन सुन्न करणारा प्रसंग

Nepal Flash Flood: नेपाळ पुराच्या विध्वंसाचा सामना करत आहे. बुधवार, २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरात ५५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १,५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.

Nepal Flood: मी 10 सेकंदाने वाचले नाहीतर... विद्यार्थीनीने सांगितला मन सुन्न करणारा प्रसंग
| Updated on: Aug 31, 2026 | 8:16 AM
Share

Nepal Flash Flood: नेपाळ पुराच्या विध्वंसाचा सामना करत आहे. बुधवार, २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरात ५५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून १,५०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांमध्ये ५०० हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यांपैकी, बेपत्ता झालेल्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असून ती ३०० हून अधिक आहे. यातच आता काही लोकांचे जीव वाचवल्याचे वृत्त समोर आले आहे. लोकांचे थोडक्यात जीव वाचले आहेत.

मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना काही मिनिटांतच वेगवेगळ्या लोकांकडून पुराच्या धोक्याची सूचना देणारे चार फोन आले. या इशाऱ्यानंतर, त्यांनी तात्काळ शाळा रिकामी करण्याचा निर्णय घेतला. राजेंद्र दवाडी हे नुवाकोटमधील त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. या शाळेत एकूण १,६०० हून अधिक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांना उंच ठिकाणी नेत असताना, दवाडी यांच्या लक्षात आले की नदीपासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेले शाळेचे वसतिगृह पुराच्या पाण्यात बुडत आहे. या ९०० विद्यार्थ्यांपैकी एक १६ वर्षीय युनिशा होती, जिच्या म्हणण्यानुसार पूर येण्याच्या काही क्षणांपूर्वीच ती तिथून निसटण्यात यशस्वी झाली.

तिने बीबीसीला सांगितले, “मी आणि माझे मित्र अवघ्या १० सेकंदांनी बचावलो. काही क्षणांतच, माझ्या डोळ्यांदेखत एक मार्केट वाहून गेले. ती आणि दुसरी एक विद्यार्थिनी शाळेच्या मागच्या एका अरुंद, चिखलमय वाटेवरून चढणीच्या दिशेने धावत गेल्या.” युनिशा आई, सबीना श्रेष्ठ म्हणाली की, “पुराची बातमी ऐकल्यानंतर कुटुंबाने तिच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक तास आतुरतेने प्रयत्न केले. मी खूप घाबरले होते. मी माझ्या मुलीला आणि तिच्या वडिलांना अनेक वेळा फोन केला, पण दोघांशीही संपर्क होऊ शकला नाही.” अखेरीस आपल्या मुलीशी संपर्क झाल्यावर श्रेष्ठ यांना थोडा दिलासा मिळाला, पण तीन दिवसांनंतर युनिशा घरी परत येईपर्यंत कुटुंब चिंतेत होते.

नेपाळच्या त्रिशुली खोऱ्यातील त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक शाळेचे प्राचार्य राजेंद्र दवाडी यांना त्यांच्या एका मित्राने सावध केले. हिमनदी कोसळल्यामुळे आलेल्या महापुराने डोंगराळ नद्यांच्या प्रवाहात हाहाकार माजवला होता, ज्यात नेपाळमध्ये ७५० हून अधिक आणि तिबेटमध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या तीन मजली शाळेत आणि आजूबाजूच्या परिसरात १,६४३ मुले राहत होती.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप