AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flash Floods : नेपाळच्या महापुरात अखेर मोठा चमत्कार! पुरात बुडालेल्या घरात ती जिवंत सापडली, 11 दिवसांपासून महिला लढत होती

या माहपुरात अनेक लोकांचा मृत्यू झालाय. पण तरीही एखादी व्यक्ती जिवंत असेल या आशेपोटी तेथे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या ऑपरेशनमध्ये संबंधित महिला जिवंत असल्याचे समोर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Nepal Flash Floods : नेपाळच्या महापुरात अखेर मोठा चमत्कार! पुरात बुडालेल्या घरात ती जिवंत सापडली, 11 दिवसांपासून महिला लढत होती
nepal flash floodImage Credit source: x
| Updated on: Sep 05, 2026 | 7:04 PM
Share

Nepal Flash Floods : नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुरामुळे सगळं उद्ध्वस्त झालं. अनेक लोकांचे संसार पाण्याखाली, चिखलाखाली दबून गेले. काही ठिकाणी तर पूर्ण कुटुंबंच पाण्यामुळे मृत्युमुखी पडले. या महाकाय संकटामध्ये आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अजूनही शेकडो लोक गायब आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे. रेस्कूय टीमकडून प्रत्येक घरात शोधमोहीम राबवली जातेय. सापडलेले मृतदेह बाहेर काढून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या महाप्रलयात अडकलेले लोक जिवंत असण्याची शक्यता तशी कमीच आहे. परंतु आता एक खूप मोठा चमत्कार घडला आहे. एक महिला तब्बल 11 दिवस अन्न-पाण्याविना होती. तरीदेखील या महापुरात तिचा जीव वाचला असून तिला रेस्क्यू टीमने तिला बाहेर काढलं आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार नेपाळच्या महापुरात बचावलेल्या महिलेचे वय 60 वर्षे आहे. नेपाळमधील नुवाकोट जिल्ह्यातील बेत्रावतीमधील ही घटना असून ती महिला साधारण 11 दिवसांपासून एका घरात बसून होती. 11 दिवस ती कोणीतरी मदतीला धावून येईल, याची वाट पाहात होती. ती महिला ज्या घरात थांबलेली होती, ते घर महापुरात पाण्याखाली गेले होते. नंतर चिखलामुळे ते घर बुजून गेले होते.

महिला जिवंत असलेली दिसली, नंतर…

चिखलात बुजलेल्या घरात ती महिला जिवंत बसलेली होती. कोणीतरी मदतीला येईल या अपेक्षेने तिचे डोळे बंद असलेल्या दरवाजाकडे होते. दरम्यान, 26 ऑगस्टच्या नैसर्गिक आपत्तीनंतर सध्या नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात आहे. बचावपथकातील जवानांनी दरवाजा खोलताच समोर जिवंत महिला दिसली. तिला नंतर पिण्यासाठी पाणी देण्यात आले. सध्या तिला बाहेर काढण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या माहपुरात अनेक लोकांचा मृत्यू झालाय. पण तरीही एखादी व्यक्ती जिवंत असेल या आशेपोटी तेथे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या ऑपरेशनमध्ये संबंधित महिला जिवंत असल्याचे समोर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. अजूनही तेथे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...