Nicolas Maduro : निकोलस मादुरो यांना भयंकर शिक्षा, थेट पृथ्वीवरच्या नकरात पाठवलं, धक्कादायक निर्णयाची जगात चर्चा!

व्हेनेझुएलाचे प्रमुख निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केली आहे. सध्या ते अमेरिकेच्या तुरुंगात आहेत. आता या तुरुंगाबाबत अनेक धक्कादायक कथा सांगितल्या जात आहेत.

Nicolas Maduro : निकोलस मादुरो यांना भयंकर शिक्षा, थेट पृथ्वीवरच्या नकरात पाठवलं, धक्कादायक निर्णयाची जगात चर्चा!
nicolas maduro and donald trump
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 05, 2026 | 3:03 PM

Nicolas Maduro : व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकने ताब्यात घेतले आहे. व्हेनेझुएलातून अमेरिकेत ड्रग्ज तस्करी केली जाते, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत करत होते. त्यानंतर त्यांनी अमेरिकन सैनिकांना आदेश देत व्हेनेझुएलावर हल्ला करण्यास सांगितले. अमेरिकन सैनिकांनी नंतर हल्ला करून मादुरो यांना तसेच त्यांची पत्नी सिलिया प्लोरेस यांना अटक केली आहे. आता मादुरो यांच्यावर खटला उभारण्यात येणार आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा जगातील काही देशांनी विरोध केला आहे. तर काही देशांनी ट्रम्प यांच्या कृतीचे स्वागत करत मादुरो यांच्या अटकेचे समर्थन केले आहे. दरम्यान, सध्या मादुरो न्यूयॉर्कमधील एका तुरुंगात आहेत. आता याच तुरुंगाबाबत नवनवी माहिती समोर आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा तुरुंग म्हणजे दुसरे यातनाघर असल्याचे बोलले जात आहे.

निकोलस मादुरो कोणत्या तुरुंगात आहेत?

मिळालेल्या माहितीनुसार निकोलस मादुरो हे न्यूयॉर्कमधील ब्रुकलीन येथील एका तुरुंगात आहेत. या तुरुंगाती सोईसुविधा आणि तेथील एकंदरीत व्यवस्था फारच बिकट असल्याचे बोलले जाते. या तुरुंगाची स्थिती एवढी भयंकर आहे की काही न्यायाधीशांनी आरोपी आणि गुन्हेगारांना तेथे पाठवण्यास नकार दिला होता. परंतु या तुरुंगात संगीतकार आर केली आणि अमेरिकन रॅपर सीन कॉम्ब्स उर्फ डीडी यालाही या तुरुंगात ठेवले होते.

एका तुरुंगात 1300 कैदी

या तुरुंगाला मेट्रोपॉलिटन डिटेंशन सेंटर (एमडीसी) असे म्हटले जाते. 1900 सालाच्या सुरुवातीला या तुरुंगाची उभारणी केली होती. सध्या या तुरुंगात साधारण 13000 कैदी बंद आहेत. हा तुरुंग समुद्राच्या काठावर औद्योगिक क्षेत्रात आहे. या तुरुंगाच्या आजूबाजूला शॉपिंग मॉल तसेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हादेखील आहे. या तुरुंगाला अनेकदा दुसरा नकर म्हणण्यात आले आहे. तसेच कैद्यांना इथे खूप त्रास दिला जातो, असा दावाही अनेक वकिलांनी आणि कैद्यांनी केलेला आहे. 2024 साली इथे दोन कैद्यांची हत्या करण्यात आली होती. तर काही तुरुंगाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचेही आरोप आहेत. त्यामुळे आता मादुरो यांच्यासोबत काय होणार? असे विचारले जात आहे.