जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी एका देशाला धमकी; व्हेनेझुएलानंतर आता…संकट वाढलं!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केली आहे. त्यानंतर आता ट्रम्प यांनी आणखी एका देशाच्या प्रमुखांना थेट धमकी दिली आहे. त्यामुळे आता वातावरण चांगलेच चिघळले आहे.

Donald Trump : सध्या अमेरिका आणि व्हेनेझुएला या दोन देशांत सध्या तणावाची स्थिती आहे. ड्रग्ज तस्कीच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या सैनिकांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली आहे. या अटकेनंतर आता जगभरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार निकोलस मादुरो यांच्याविरोधात खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, ट्रम्प यांनी मादुरो यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर आता कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. पेट्रो नेहमीच ट्रम्प यांच्या धोरणाचे विरोधक राहिलेले आहेत. त्यानंतर मादुरो यांना अटक केल्यानंतर पेट्रो ट्रम्प यांच्यावर सडकून टीका करत आहेत. याच कारणामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी पेट्रो यांनाच धमकी दिली आहे. त्यामुळे व्हेनेझुएला या देशानंतर कोलंबियाचा क्रमांक येणार का? असे विचारले जात आहे.
नेमकं काय घडलं?
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुस्तावो पेट्रो यांना धमकी दिली आहे. पेट्रो यांनी स्वत:ची काळजी घ्यावी. पेट्रो सध्या कोकेन विकत आहेत. हे कोकेन ते अमेरिकेत पाठवत आहेत. त्यामुळेच त्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असा थेट इशारा ट्रम्प यांनी पेट्रो यांना दिला आहे. दुसरीकडे पेट्रो यांनी मादुरो यांच्यावरील हल्ला म्हणजे लॅटीन अमेरिकेच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला आहे. सोबतच अमेरिकेच्या या धोरणामुळे मानवावर संकट निर्माण होऊ शकतो, असे पेट्रो यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅरेबियन सागरात सैन्य तैनात केले होते. या भागातून अमेरिकेत होणारी ड्रग्ज तस्करी थांबवण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला होता. परंतु ट्रम्प यांच्या या निर्णयाला पेट्रो यांनी अगोदरपासूनच विरोध केलेला आहे. ड्रग्ज तस्करी, स्थलांतर, प्रादेशिक सुरक्षा या मुद्द्यांमुळे ट्रम्प आणि पेट्रो हे एकमेकांचे विरोधक राहिलेले आहेत. व्हेनेझुएलावर हल्ला करण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियावरदेखील भाष्य केलेले आहे. कोलंबियामध्ये ड्रग्ज निर्मिती करणाऱ्या कारखान्यांवर हल्ला करण्यास मी नकार देणार नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. तर ट्रम्प यांचे हे भाष्य म्हणजे दुसरी हल्ल्याची धमकीच आहे, असा आरोप पेट्रो यांनी केला होता. दरम्यान, आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पेट्रो यांना धमकी दिल्यामुळे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
