MVA | राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत संभ्रम; अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
उद्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना महाविकास आघाडीकडून नेमका कोण उमेदवार असणार? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत महाविकास आघाडीत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती दिली.
उद्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना महाविकास आघाडीकडून नेमका कोण उमेदवार असणार? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत महाविकास आघाडीत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती दिली. त्यांच्या ट्विटनंतर चर्चांना अधिक वेग आला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, “ही जागा महाविकास आघाडीची आहे. महाविकास आघाडी एकत्र असेल तर ही जागा निश्चित निवडून येईल.” तसेच कोणताही एक पक्ष स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर करू शकत नाही, कारण हा आघाडीचा निर्णय असणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राऊत पुढे म्हणाले की, विधिमंडळात महाविकास आघाडीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असून त्यांचे 20 आमदार आहेत. काँग्रेसचे 16 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. “आम्ही एकत्र राहिलो तर एक जागा निश्चित निवडून येईल. एकत्र राहणं गरजेचं आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापर्यंत असल्याने महाविकास आघाडीचा अंतिम निर्णय काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुढीपाडव्याला हापूस आंबा नाही?, सिंधुदुर्गातील बागायतदार चिंतेत
सरकारी पत्रात भाजप आमदारच ‘भूमाफिया’, मोठी खळबळ
पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर...रस्त्यावरच घरगुती गॅसचे वाटप
ऑपरेशन सक्सेस फुल आणि पेशंट..., एलपीजी तुटवड्यावरून राऊतांची....

