व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या कारवाईनंतर भारत अॅक्शन मोडवर, थेट सूचना जारी करत…
व्हेनेझुएलामध्ये मोठी कारवाई करण्यात आली असून अमेरिकेने जोरदार हल्ले करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. या अटकेचा फोटोही शेअर करण्यात आला. यानंतर आता जगात खळबळ उडालीये.

व्हेनेझुएलामध्ये मोठी खळबळ उडाली असून अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला करून थेट व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नीला अटक करून अमेरिकेत नेले आहे. अमेरिकेच्या या कारवाईचा जगाने संताप व्यक्त केला. एखाद्या देशाच्या अध्यक्षाला अशाप्रकारे अटक करून आपल्या देशात नेणे चुकीचे असल्याचे अनेकांनी म्हटले. थेट हात बांधून घसीटून व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेत नेण्यात आले. यादरम्यानचा एक फोटोही अमेरिकेकडून शेअर करण्यात आला. अनेक देश अमेरिकेच्या या कारवाईच्या विरोधात भूमिका घेताना दिसत असून एखाद्या देशावर अशाप्रकारे कारवाई करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. अमेरिकेच्या या कारवाई जगात खळबळ उडाली असून उत्तर कोरियाने तर थेट म्हटले की, अमेरिकेच्या या चुकीमुळे जग महायुद्धाच्या स्थित आहे. याची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल. मादुरो यांची सुटका करावी, असेही उत्तर कोरियाने म्हटले.
व्हेनेझुएलामध्ये सध्या असलेल्या पार्श्वभूमीवर भारतानेही आपल्या नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएलामध्ये प्रवास टाळावे, असे स्पष्ट सांगण्यात आले. परराष्ट्र मंत्रालयाने व्हेनेझुएलामधील सर्व भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून फार जास्त महत्वाच्या कामाशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. व्हेनेझुएलामध्ये सध्या प्रचंड तणावाची स्थिती असून कोणत्याही परिस्थितीला काहीही होऊ शकते.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांना व्हेनेझुएलाला सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना दूतावासाशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे. व्हेनेझुएलामध्ये अंदाजे 50 अनिवासी भारतीय आणि 30 भारतीय वंशाचे लोक आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली. भारतीयांना दूतावासाशी संपर्कात राहण्याचेही सांगण्यात आले.

मादुरोच्या राजवटीत देश गंभीर आर्थिक संकटात सापडला. अमेरिका गेल्या काही दिवसांपासून व्हेनेझुएलाच्या जहाजांवर सतत हल्ले करत होती. त्यामध्येच त्यांनी थेट व्हेनेझुएलावर हल्ला करत मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली. जगाच्या नजरा सध्या अमेरिकेवर असून मादुरो यांच्यासोबत अमेरिका नेमकी काय करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, यामुळे जगात तणावाची स्थिती आहे.
