AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 लाखाहून अधिक भारतीय विदेशात अडचणीत, मोठी खळबळ, नोकऱ्यांवर पाणी सोडून थेट..

अमोरिका गेल्या काही दिवसांपासून व्हिसाच्या नियमात सातत्याने बदल करताना दिसत आहे. त्यामध्येच अमेरिकेत जाऊन नोकरी करणे कठीण झाले. आता कॅनडातील भारतीय नागरिक अडचणीत सापडले आहेत.

10 लाखाहून अधिक भारतीय विदेशात अडचणीत, मोठी खळबळ, नोकऱ्यांवर पाणी सोडून थेट..
Indian citizens in Canada
| Updated on: Jan 03, 2026 | 9:57 AM
Share

अमेरिकेने H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. ज्यानंतर जगभरात खळबळ उडाली. हेच नाही तर H-1B व्हिसाच्या नियमात बदल केल्याने आयटी कंपन्याही अडचणीत आल्या आहेत. व्हिसा मिळवण्यासाठी विलंब होत आहे. भारतीय नागरिक मोठ्या संख्येने अमेरिकेत जाऊन नोकऱ्या करतात. मात्र,  H-1B व्हिसाच्या नियमातील बदलामुळे थेट फटका बसला. कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेत होणारे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. कंपन्या आपल्या कुशल कामगारांना H-1B व्हिसा देऊन अमेरिकेत नोकरीसाठी बोलावतात. आता एका H-1B व्हिसासाठी 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. भारतीय मोठ्या संख्येने कॅनडात देखील राहतात. मात्र, नुकताच कॅनडा सरकारने धक्कादायक अशी आकडेवारी जारी केली, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली.

अमेरिकेनंतर कॅनडातील भारतीय अडचणीत आले आहेत. कॅनडामध्ये अवैध स्थलांतरितांच्या संख्येत मोठ्या वाढीची भीती व्यक्त केली जात होती. त्यामध्ये जास्त संख्या भारतीयांची असल्याचेही सांगितले जात होते. कॅनडामध्ये लाखो वर्क परमिट्सची मुदत संपत आहे. इमिग्रेशन अँड सिटिझनशिप कॅनडाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इमिग्रेशन सल्लागार कंवर सेराह यांनी सांगितले की, 2025 च्या अखेरला साधारपणे 10, 53,000 वर्क परमिटची मुदत संपली आहे.

9,27,000 वर्क परवान्यांची मुदत 2026 मध्ये संपणार आहे. जेव्हा वर्क परवान्याची मुदत संपते, तेव्हा परवानाधारकाचा कायदेशीर दर्जा आपोआप संपतो. जोपर्यंत त्यांना दुसरा व्हिसा मिळत नाही तोपर्यंत ते कायमचे रहिवासी होत नाहीत, हा नियम आहे. कामगार आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी कॅनेडियन सरकारच्या वाढत्या कठोर स्थलांतर नियमांमुळे आता व्हिसा मिळणे अधिक कठीण झालंय. अमेरिकेप्रमाणेच कॅनडा देखील व्हिसाचे नियम कडक करताना दिसतोय.

कॅनडात सर्वाधिक भारतीय लोक राहतात. हेच नाही तर कॅनडाला मिनी पंजाब म्हणूनही ओळखले जाते. कॅनडामध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोकांच्या कायदेशीर दर्जा धोक्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2026 च्या पहिल्या 3,15,000 लोकांचा कायदेशीर दर्जा रद्द होण्याची शक्यता आहे. कंवर सारा यांच्या मते, 2026 च्या मध्यापर्यंत 20 लाख लोक कॅनडामध्ये कायदेशीर दर्जाशिवाय राहत असतील आणि त्यापैकी अंदाजे निम्मे लोक भारतीय आहेत, या लोकांवर कारवाई होऊ शकते. धडाधड त्यांना कॅनडा सोडवा लागेल. मिळालेल्या माहितीनुसार, अवैध स्थलांतरित लोक जंगलांमध्ये तंबूंमध्ये राहत आहेत.

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.