माझ्या मित्राला सोडा… अमेरिकेला थेट किम जोंगची धमकी, महायुद्धाचा धोका, रशियानेही..
अमेरिकेने उचललेल्या एका चुकीच्या पावलाची किंमत संपूर्ण जगाला मोजावी लागू शकते. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेने अटक केली असून थेट व्हेनेझुएलावर ताबा मिळवला आहे. मात्र, अमेरिकेच्या कारवाईचा जगभरातून विरोध केला जातोय.

अमेरिकेने मोठी कारवाई शेजारी देश व्हेनेझुएलावर केल्याने मोठी खळबळ उडाली. अगोदर मोठा हल्ला केला आणि त्यानंतर थेट व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करून थेट अमेरिकेत आणले. एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्याच देशातून कसे उचलून आणले याचाही फोटो डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केला, ज्याने खळबळ उडाली. मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प सतत निकोलस मादुरो यांना धमक्या देताना दिसत होते. त्याच्या देशाच्या जमीनवर जाऊन हल्ले केली जात होती. शेवटी निकोलस मादुरो यांना राष्ट्रपती भवनातून थेट उचलत अमेरिकेने अटक केली. मादुरो राखाडी रंगाचा ट्रॅकसूट घातलेले दिसत असून त्यांचे हात बांधण्यात आले असून त्यांचे डोळेही बांधली आहेत. अमेरिकेच्या या कारवाईमध्ये जगात मोठी खळबळ उडाली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ट्रुथ सोशलवर मादुरो यांचा पहिला फोटो पोस्ट केला, ज्यामध्ये ते यूएसएस इवो जिमा या जहाजावर दिसत आहेत. ट्रम्प लिहिले की, निकोलस मादुरो यूएसएस इवो जिमा जहाजावर… आता अमेरिकेची ही कारवाई चुकीची असल्याचे अनेकांनी म्हटले असून व्हेनेझुएला आता पूर्णपणे अमेरिकेच्या नियंत्रणात आहे. शेवटी व्हेनेझुएलाच्या समर्थनार्थ जगातील शक्तीशाली नेता आला.
हेच नाही तर थेट अमेरिकेला मोठी धमकी देण्यात आली. उत्तर कोरियाने मादुरो हे आपले मित्र असल्याचे अमेरिकेला थेटपणे सांगत थेट महायुद्धाचा इशाराच दिला. उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी अमेरिकेला चेंतावणी दिली. हेच नाही तर अमेरिकेची ही कारवाई जगाला महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवत आहे. अमेरिकेने निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर जगाला सध्या काय स्थिती आहे, याची माहिती द्यावी असेही किम जोंग उन यांनी म्हटले.
अमेरिकेचे हे एक पाऊस जागतिक युद्धाला तोंड फोडू शकते, असेही त्यांनी यावेळी म्हटले. किम जोंग यांनी मादुरोल तातडीने सोडा अन्यथा वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल असेही त्यांनी म्हटले. हेच रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनीही अमेरिकेच्या या कारवाईचा विरोध केला. एखाद्या देशावर अशाप्रकारे अतिक्रमण करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. मेयर जोहरान ममदानी यांनीही ही कारवाई चुकीची असल्याचे म्हटले.
