AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Smit Machchchar: स्मित मछार यांच्यावर हल्ला करणारा ओमानी पायलट आता कुठे? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

Smit Machchchar: कॅप्टन स्मित मछार यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत, तर त्यांच्यावर हल्ला करणारा ओमानी पायलट आता कुठे आहे? असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. त्याच्याबद्दल देखील धक्कादायक सत्य समोर आलं आहे... यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील धक्कादायक दावा केला आहे.

Smit Machchchar: स्मित मछार यांच्यावर हल्ला करणारा ओमानी पायलट आता कुठे? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य
Smit Machchchar
| Updated on: Oct 02, 2026 | 1:24 PM
Share

Smit Machchchar: कॅप्टन स्मित मछार दुबईहून तेल अवीवला जाणारं फ्लायदुबईचं विमान FZ1073 चालवत होते. उड्डाणादरम्यान, त्यांच्या सह-वैमानिकाने हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात स्मित मछार जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर प्लेन क्रॅश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानी वैमानिकाला यूएईच्या ताब्यात दिलं आहे. कॉकपीटमध्ये आरोपी वैमानिकाने स्मित मछार यांच्या हल्ला करत त्यांनी गंभीर जखमी केलं आहे. अशा परिस्थितीत स्मित मछार यांनी कॉकपीटचा दरवाजा उघडला आणि त्यानंतर काही प्रवासी तात्काळ कॉकपीटमध्ये आले आणि आरोपी वैमानिकावर त्यांनी नियंत्रण मिळवलं… स्मित मछार यांच्या कामगिरीमुळे आज 180 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. तर विमान सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आलं तिथे आरोपीवर स्मित मच्छार याच्यासह वैद्यकीय उपचार करण्यात आले आणि त्यानंतर तपासासाठी त्याला संयुक्त अरब अमिरातीच्या ताब्यात देण्यात आले.

यूएई आता याप्रकरणी कसून चौकशी सुरु केली आहे. यूएई येखील न्याय विभाग आता कॉकपिटमध्ये घडलेल्या घटनेशी संबंधित परिस्थितीची चौकशी करेल. हे विमान दुबईहून इस्रायलमधील तेल अवीवच्या दिशेने जात होतं, परंतु अपरिहार्य परिस्थितीमुळे त्याला सौदी अरेबियामध्ये आपत्कालीन लँडिंग करावं लागलं.

ट्रम्प यांच्याकडून इराण कनेक्शनचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याप्रकरणी मोठा दावा केला आहे. फ्लाईदुबई विमान पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या को-पायलटचा इराणशी संबंध असू शकतो. व्हाईट हाऊसमध्ये गुरुवारी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांना विचारण्यात आलं की, या हल्ल्यामागील को-पायलट आणि तेहरान यांच्यात काही संबंध असल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे का? त्यावर ते म्हणाले, “आम्ही सध्या यावर काम करत आहोत.”

ट्रम्प पुढे म्हणाले, “मी जे काही ऐकत आहे, त्यावरून माझे उत्तर ‘होय’ असेल, परंतु आम्ही अद्याप यावर अधिक चौकशी करतआहोत.” त्यांनी याविषयी कोणतीही सविस्तर माहिती दिली नाही. हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचं निष्पन्न झाल्यास अमेरिका तेहरानवर काही प्रत्युत्तर देणार का, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प म्हणाले, “होय, त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, ते पुढे म्हणाले, “तुम्ही त्यांनाच विचारा. त्यांना माहीत आहे काय घडलं ते. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.”, असं देखील ट्रम्प म्हणाले आहेत.

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद