AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran War : काल नियुक्ती आज खात्मा… इराणचा नवा सर्वोच्च नेता अराफी यांनाही मारलं; अचानक…

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका अनेक देशांना बसतोय. त्यामध्येच आता अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारी माहिती पुढे येत आहे.

Iran War : काल नियुक्ती आज खात्मा... इराणचा नवा सर्वोच्च नेता अराफी यांनाही मारलं; अचानक...
Supreme Leader Ali Reza Arafi
| Updated on: Mar 02, 2026 | 12:14 PM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहे. अनेक क्षेपणास्त्र टाकली जात आहेत. इराणमधील प्रमुख शहरे निशाण्यावर आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लगेचच नव्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांची निवड करण्यात आली. आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा जीव गेला. इराणमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, सरकारी इमारती पाडण्यात आल्या. त्यामध्येच अमेरिकेने अत्यंत मोठा दावा अमेरिकेकडून करण्यात आला. हा दावा इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबद्दल आहे, या दाव्याने खळबळ उडाली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांनाही हल्ल्यात ठार करण्यात आल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेने केला आहे. खरोखरच नव्या सर्वोच्च नेत्यालाही ठार केले का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकेच्या या दाव्यावर इराणकडून अजून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उलट आपली लष्करी ताकद दाखवणारा व्हिडीओ त्यांनी शेअर केला.

इराणी लोक सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याच बघायला मिळाले. त्यामध्येच अमेरिकेच्या दाव्याने जगात खळबळ उडाली. अली रजा अराफी मारले गेल्याचा दावा NSA ने केला. इस्त्रायलच्या न्यूक्लिअर प्लॅंटवर इराणकडून मोठा धमाका करण्यात आला. या युद्धाच्या झळा अनेक खाडी देशांना बसताना दिसत आहेत. फ्रेंचची युद्ध नाैका इराणच्या दिशेने निघाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट दावा करत म्हटले की, नवे सर्वोच्च नेते खामेनी यांना ठार करण्यात आले. या हल्ल्यात इस्त्रायलचे 100 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला. हेच नाही तर इराणने अमेरिकेचे जेटही पाडले, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इस्त्रायलवर अधिक भीषण हल्ला करणार असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणवर अमेरिका मोठे हल्ले करत आहे. या युद्धाचा थेट फटका दुबईला बसल्याचे दिसत आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?