AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, भारताविरोधातील कुरापती चांगल्याच भोवल्या, थेट फ्रान्सने…

Operation Sindoor : पाकिस्तानने आपले सैन्य भारतापेक्षा श्रेष्ठ अलस्याचे दाखविण्यासाठी भारताची राफेल विमाने पाडल्याचा दावा केला होता. मात्र आता पाकिस्तानचा बुरखा फाटला असून त्यांचा खोटारडेपणा समोर आला आहे.

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, भारताविरोधातील कुरापती चांगल्याच भोवल्या, थेट फ्रान्सने...
modi and sharif
| Updated on: Nov 23, 2025 | 6:37 PM
Share

पाकिस्तानच्या खोटारडेपणाच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतील. आता पुन्हा एकदा पाकिस्तानचा बुरखा फाटला आहे. पाकिस्तानने आपले सैन्य भारतापेक्षा श्रेष्ठ अलस्याचे दाखविण्यासाठी भारताची राफेल विमाने पाडल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने भारतीय राफेल लढाऊ विमाने पाडल्याचा खोटा अहवाल प्रकाशित केला होता मात्र आता फ्रान्सने हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचा खोटारडेपणा समोर

जिओ टीव्हीच्या अहवालात फ्रेंच नौदल हवाई तळ लँडिव्हिसियोचे कमांडर जॅक लॉने यांनी भारतीय राफेल पाडल्याची कबुली दिली होती असा दावा करण्यात आला होता. मात्र आता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे समोर आला आहे. कारण फ्रेंच नौदलात या नावाचा कोणताही कमांडर नाही अशी माहिती समोर आली आहे. नौदलातील कमांडरचे नाव यवान लॉने असे आहे.

अहवाल चुकीचा – फ्रेंच नौदल

फ्रेंच नौदल मरीन नॅशनलने हा अहवाल खोटा असल्याचे म्हटले आहे. नौदलाने जिओ टीव्हीच्या अहवालाचा स्क्रीनशॉट शेअर केला करत तो खोटा असल्याचे म्हटले आहे. या अहवालात अत्यंत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती असल्याचे नौदलाने म्हटले आहे. तसेच कमांडर यवान लॉने यांनी असे विधान केलेले नाही आणि पाकिस्तानने ते छापण्याची परवानगीही घेतलेली नाही.

फ्रेंच नौदलाने स्पष्टीकरण देताना म्हटले की, आम्ही कमांडरला ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल पाडण्याच्या विधानाबद्दल विचारले तेव्हा त्यांनी म्हटले की, मी भारतीय विमान पाडले असल्याचे सांगितले नाही. फ्रेंच नौदलाने असेही म्हटले की या अहवालात कॅप्टन लॉने यांचे पद आणि जबाबदाऱ्यांबाबत चुकीची माहिती देण्यात आलेली आहे.

पराभव लपविण्यासाठी खोटा अहवाल

भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या कारवाईत पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्यात भारतीय सैन्याला यश आले होते. मात्र पाकिस्तानने आपला पराभव लपवण्यासाठी खोटारडे दावे केले होते. पाकिस्तानने परदेशी माध्यमांसमोर भारतीय राफेल विमान पाडले असल्याचे म्हटले होते. मात्र भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवले होते. या कारवाईत भारताने पाकिस्तानमधील 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...