AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानला फ्यूल बॉम्बचा झटका, इंधनाचे दर ऐकून फुटेल घाम, अर्थव्यवस्थेला फटका ?

मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम झाला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ केली असून, त्यामुळे सर्वसामान्य लोकांवरील महागाईचा डोंगर कोसळला आहे.

पाकिस्तानला फ्यूल बॉम्बचा झटका, इंधनाचे दर ऐकून फुटेल घाम, अर्थव्यवस्थेला फटका ?
पाकिस्तानमध्ये इंधनाच्या दरात भडका
| Updated on: Apr 03, 2026 | 11:58 AM
Share

महिन्याभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या युद्धामुळे मध्यपूर्वेत संघर्षाचं, तणावाचं वातावरण आहे. यामुळे संपूर्ण जगावर मोठा परिणाम होत असून हा तणाव आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाऱ्याच वेगाने वाढणाऱ्या किंमतीचा पाकिस्तानच्या नागरिकांच्या जीवनातही त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ऐतिहासिक वाढ करून जनतेवर महागाईचा मोठा बोजा लादला आहे. दुचाकीस्वारांसाठी मर्यादित दिलासा जाहीर करण्यात आला असला तरी, वाढलेल्या इंधन दरांमुळे दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला आहे.

रॉयटर्स न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेत सांगितले की, पेट्रोलच्या दरात 137.24 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 184.49 रुपयांनी प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दरवाढीनंतर पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा दर आता प्रति लिटर 321.17 रुपयांवरून 458.41 झाला असून, हाय-स्पीड डिझेलचा दर 335.86 वरून 520.35 प्रति लिटर झाला आहे. हे नवीन दर आजपासून, म्हणजेच 3 एप्रिलपासून लागू झाले आहेत. याआधी महिन्याभरापूर्वी 6 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये पेट्रोल प्रति लिटर 48.07 ने आणि डिझेल प्रति लिटर 61.78 रुपयांनी महाग झाले होते.

भारताच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये इंधन किती महाग ?

सध्याच्या करन्सी एक्स्चेंज दरानुसार, 1 पाकिस्तानी रुपया 0.33 भारतीय पैशांच्या बरोबर आहे. त्यानुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलची नवीन किंमत भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 152.60 रुपये प्रति लिटर आहे आणि डिझेलची किंमत 173.23 रुपये आहे. दिल्लीमध्ये नॉर्मल पेट्रोलची किंमत 94.77 रुपये प्रती लिटर आहे. म्हमजेच पाकिस्तानमध्ये पेट्रोल हे भारतापेक्षा 57.83 रुपयांनी महाग आहे. तसचे दिल्लीत डिझेलची किंमत 87.67 रुपये असून पाकिस्तानमध्ये डिझेल भारतापेक्षा 85.56 रुपयांनी महाग आहे.

दरम्यान मोटारसायकल युजर्सना जास्तीत जास्त 20 लिटरपर्यंत 100 रुपये प्रति लिटर या सवलतीच्या दराने अनुदानित पेट्रोल मिळेल, असं अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी सांगितलं. जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर, ब्रेंट क्रूडच्या किमती जवळपास 109.12 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या, तर डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमती 12.5 % नी वाढून 112.60 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या, ही 9 मार्चनंतरची सर्वोच्च पातळी आहे.

यापूर्वी, 27 मार्च रोजी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 95 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 203 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव फेटाळल्याचे जाहीर केले होते. सरकार हा भार जनतेवर टाकणार नाही आणि अंदाजे 56 अब्ज रुपयांचा अतिरिक्त खर्च सरकार स्वतः उचलेल, असं त्यांनी सांगितलं. हे आश्वासन दिल्यानंतर अवघ्या एका आठवड्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मध्य-पूर्वेतील सध्याची अस्थिरता हे या दरवाढीचे कारण असल्याचे पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री, अली परवेझ मलिक यांनी म्हटले होते.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?