AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगानिस्तानच्या पहिल्या उपराष्ट्रपतींकडून खास फोटो शेअर, पाकिस्तानची आगपाखड

सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये पाकिस्तानच्या फाळणीतून बांग्लादेशची निर्मितीचा फोटो शेअर करत निशाणा साधलाय. 1971 मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध होऊन पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला. यात भारताची महत्त्वाची भूमिका होती.

अफगानिस्तानच्या पहिल्या उपराष्ट्रपतींकडून खास फोटो शेअर, पाकिस्तानची आगपाखड
माजी उपराष्ट्रपती सालेह यांनी स्वत:च्या गार्डला दोन गोळ्या घालायला सांगितलं
| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 22, 2021 | 5:46 AM
Share

काबूल : तालिबानच्या मुद्द्यावर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान आमनेसामने आलेत. अफगाणिस्तान सातत्याने पाकिस्तानवर तालिबानला मदत करत शांतता भंग करण्याचा आरोप करत आलाय. हा आरोप अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी पाकिस्तानचं हवाई दल तालिबान्यांना मदत करत असल्याचा आरोप केल्यानंतर होतोय. आता अमरुल्ला सालेह यांनी एक असा फोटो ट्विट केलाय ज्यामुळे पाकिस्तानला मिर्च्या झोंबल्यात.

सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये पाकिस्तानच्या फाळणीतून बांग्लादेशची निर्मितीचा फोटो शेअर करत निशाणा साधलाय. 1971 मध्ये पाकिस्तानसोबत युद्ध होऊन पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला. यात भारताची महत्त्वाची भूमिका होती. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं या कामासाठी कायमच कौतुक होत आलंय. हाच आधार घेऊन सालेह यांनी पाकिस्तानला चिमटा काढलाय.

अमरुल्ला सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “इतिहासात असा फोटो कधीच नव्हता आणि कधीच नसेल. हो, काल एक रॉकेट हवेतून उडत आलं आणि माझ्या जवळ काही मिटर अंतरावर पडलं. त्यामुळे मी हादरून गेलो होतो. पाकिस्तानच्या प्रिय हल्लेखोरांनो तालिबान आणि दहशतवाद या फोटोचा घाव भरुन काढू शकत नाही. दुसरा मार्ग शोधा.”

अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या या फोटो ट्विटनंतर भारतीयांनी याला पाठिंबा दिलाय, तर पाकिस्तानचा मात्र तिळपापड झालाय. काही पाकिस्तानी युजर्सने रॉकेट हल्ल्याच्यावेळी सालेह यांचा घाबरल्याचा व्हिडीओ शेअर करत ट्रोल केलंय. सालेह यांनी आपल्या अन्य एका ट्विटमध्ये म्हटलंय, “पाकिस्तानच्या हवाई दलाने अफगाणी सैन्य आणि हवाई दलाला स्पिन बोल्डक भागात तालिबानवर कारवाई करण्यास विरोध केलाय. तसेच तालिबानींना या भागात जवळच्या हवाई तळावरुन मदत केली जात आहे.”

हेही वाचा :

Video:ऐन रॉकेट हल्ल्यात जेव्हा अफगाण राष्ट्रपतींनी नमाज सुरुच ठेवली, बघा नेमकं काय घडलं?

देशाला हादरुन टाकणारे फोटो काढणाऱ्या भारतीय फोटोग्राफरची अफगाणिस्तानमध्ये हत्या, तालिबानच्या हल्ल्यात अखेरचा श्वास

अफगाणिस्तानमध्ये शेकडो महिला बंदुका घेऊन रस्त्यावर, कारण काय?

व्हिडीओ पाहा :

Pakistan get angry over tweet of vice president of Afghanistan on Bangladesh

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या