AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video:ऐन रॉकेट हल्ल्यात जेव्हा अफगाण राष्ट्रपतींनी नमाज सुरुच ठेवली, बघा नेमकं काय घडलं?

अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं काढता पाय घेतलाय. वीस वर्षानंतर अमेरिकन सैनिक परत गेलंय. त्यामुळे अफगाणिस्तानात पुन्हा एकदा अफगाण फोर्सेस आणि तालिबान आमने सामने लढतायत. त्यातच 85 टक्केपेक्षा जास्त भागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान्यांनी केलाय.

Video:ऐन रॉकेट हल्ल्यात जेव्हा अफगाण राष्ट्रपतींनी नमाज सुरुच ठेवली, बघा नेमकं काय घडलं?
Afghanistan Kabul Rocket Attack Bakri Eid
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 3:02 PM
Share

बकरी ईद म्हणजेच ईद उल अजहा हा जगभरातील मुसलमानांचा दुसरा मोठा सण-उत्सव. या दोन्ही उत्सवांच्या दिवशी मशिदीत किंवा ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम समाज नमाज अदा करतो. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्येही बकरी ईद साजरी केली जातेय. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवनातही नमाज पठण केलं जातं होतं. यात राष्ट्रपती अश्रफ घनीही होते. नमाज अदा करत असतानाच त्याच वेळेस तालिबान्यांनाचा रॉकेट हल्ला सुरु झाला. कुठल्याही क्षणी रॉकेट अंगावर येऊन पडतील अशी शक्यता असतानाही राष्ट्रपती आणि इतर नमाजींनी नमाज मात्र थांबवला नाही. ऐन रॉकेट हल्ल्यातही नमाज सुरुच राहीला. अफगाण सरकारी टीव्हीवर हे दृश्य लाईव्ह सुरु होतं.

बकरी ईद मुळातच कुर्बानी देण्यासाठी साजरी केली जाते. तसेही काहीही झालं तरी नमाज अर्ध्यावर सोडण्याची प्रथा, परंपरा इस्लाममध्ये नसल्याचं जाणकार सांगतात. त्यामुळेच रॉकेट हल्ला होत असतानाच, जोराचा आवाज होत असतानाही अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी नमाज सुरुच ठेवला. हाच रॉकेट हल्ला राष्ट्रपतींसह इतरांच्या जीवावरही बेतला असता पण नमाजाला महत्व देत त्यांनी तो सुरुच ठेवला. त्यांच्या ह्या कृतीचं जगभर कौतूक केलं जातंय.

काय आहे व्हीडीओत नेमकं? तालिबान्यांचा रॉकेट हल्ला सुरु असतानाही अफगाण राष्ट्रपतींनी नमाज सुरुच ठेवला ह्या घटनेचा व्हीडीओ जगभर पाहिला जातोय. फार तर अर्ध्या मिनिटाचा हा व्हीडीओ आहे. ह्या व्हीडीओत शंभर एक जण अफगाणिस्तानच्या राष्ट्रपती भवनात नमाज अदा करतायत. त्यात अफगाण राष्ट्रपती अश्रफ घनी हे पहिल्या रांगेत आहेत. त्याच्या आजुबाजूला मागे काही नागरिक आहेत, काही सैन्य अधिकारी आहेत तर काही सुरक्षा अधिकारीही आहेत. नमाज सुरु झालेली आहे. जो नमाज लीड करतायत त्याचा स्पीकरवरचा आवाज स्पष्ट ऐकू येतोय. नमाज सुरु असतानाच अचानक रॉकेट हल्ल्याचा जोरदार आवाज येतो. राष्ट्रपती भवनच्या आसपास काही मीटरवर हे रॉकेट पडलं असावं. त्याच्या आवाजाच्या तीव्रतेवरुन याचा अंदाज येतो. पण हल्ला होत असतानाही ना राष्ट्रपती घनी आणि इतर कुणी नमाज अर्ध्यावर सोडली नाही. आवाजासह सर्व नमाजी मात्र एकदम दचकले. एक जण मात्र त्या आवाजासह तिथून पळ काढण्याच्या तयारीत असतानाच तो थांबला. कारण त्याच्या असं लक्षात आलं की नमाज सोडून कुणीही पळून जात नाही. तसा तो एकटाच घाबरलेला आहे. पण इतरांना पहाताच तोही थांबला आणि रॉकेट हल्ल्यातही नमाज पूर्ण केली गेली. अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय घडतंय? अफगाणिस्तानमधून अमेरिकेनं काढता पाय घेतलाय. वीस वर्षानंतर अमेरिकन सैनिक परत गेलंय. त्यामुळे अफगाणिस्तानात पुन्हा एकदा अफगाण फोर्सेस आणि तालिबान आमने सामने लढतायत. त्यातच 85 टक्केपेक्षा जास्त भागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान्यांनी केलाय. कंदहार, काबूलसह मोठ्या शहरांमध्ये ही लढाई सुरु आहे. अशाच एका हल्ल्यात गेल्या आठवड्यात भारतीय फोटो जर्नलिस्ट दानिश सिद्दीकींचा मृत्यू झालाय.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.