AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या मित्राची अफगाणिस्तानला थेट साथ, पाकिस्तानचा थयथयाट, भारताप्रमाणेच..

Russia-Taliban Military Alliance : पाकिस्तान, चीन आणि अमेरिकाला मोठा दणका बसला. सर्वात मोठा झटका पाकिस्तानला बसला असून पाकिस्तानचा थयथयाट बघायला मिळत आहे. रशियाने एकाच दगडात तीन पक्षी मारल्याचे बघायला मिळत आहे. पाकिस्तानची तर झोपच उडालीये.

भारताच्या मित्राची अफगाणिस्तानला थेट साथ, पाकिस्तानचा थयथयाट, भारताप्रमाणेच..
Russia-Taliban Defence Deal
| Updated on: May 29, 2026 | 9:03 AM
Share

पाकिस्तान, चीन आणि अमेरिकेची झोप उडवणारा निर्णय रशियाने घेतला. रशियाकडून एकाच दगडात तीन पक्षी मारण्यात आले. नेहमीप्रमाणेच पाकिस्तानने भारतावर बिनबुडाचे आरोप केले. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी तालिबानवर हल्ला केला. ते म्हणाले की, तालिबान पाकिस्तानविरोधात भारतासोबत मिळून काम करत आहे. दुसरीकडे रशियाने इतका मोठा धक्का पाकिस्तानला दिला की, पळता भुई कमी पडली. रशियाने अफगाणिस्तानला हाताला धरून मोठा डाव खेळला. ज्यामुळे चीन आणि अमेरिकेचेही टेन्शन वाढले. रशियाने तालिबानसोबत लष्करी सहकार्य वाढवण्याचा करार केला. अफगाणिस्तानने रशियाला मदत मागताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला. मॉस्को येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंचामध्ये रशियाने अफगाणिस्तानसोबतच्या कराराला मंजुरी दिली. या कार्यक्रमात तालिबानचे संरक्षण मंत्री उपस्थित होते.

तालिबान सरकारला मान्यता दिल्यानंतर रशियाने तालिबानसोबत इतक्या उच्च पातळीचे संरक्षण सहकार्य प्रस्थापित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, या कराराबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. दोन्ही देशाने कराराला मान्यता दिल्याचे कळताच पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला. रशियावर टीका करता येत नसल्याने थेट भारतावर पाकिस्तानकडून टीका करण्यात आली.

कराराबाबत अधिक माहिती पुढे येऊ शकली नसलीतरीही, एका अहवालानुसार, तालिबान संरक्षणमंत्र्यांनी रशियाकडे एका आधुनिक हवाई संरक्षण प्रणालीची मागणी केली. अफगाणिस्तानलाही S-400 किंवा पॅन्टसिर हवाई संरक्षण प्रणाली मिळेल का, याबद्दल चर्चा आहे. सोव्हिएत युनियनच्या काळात अफगाणिस्तानवर आक्रमण करणारा रशिया, त्यावेळी तालिबानशी लढत होता. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सतत अफगाणिस्तानवर हल्ले करत आहे. पाकिस्तानच्या लष्करी ताकदीपुढे अफगाणिस्तानची ताकद कमीच आहे.

आता अफगाणिस्तान लष्करी ताकद वाढवण्याकरिता प्रयत्न करत आहे. जर रशियाने S-400  अफगाणिस्तानला दिले तर त्यांची ताकद वाढले. मात्र, हा फक्त पाकिस्तानच नाही तर अमेरिकेलाही मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. चीन देखील अलर्ट मोडवर आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात चांगलीच मैत्री आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर भारताने अफगाणिस्तानला मदत पाठवली होती. सतत पाकिस्तान अफगाणिस्तानवर मोठे हल्ले करत आहे.

Follow Us
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा