अरेरे, पाकिस्तानची मोठी नाचक्की, पंतप्रधानांना तोंड लपून पळण्याची वेळ, थेट संयुक्त राष्ट्रांमध्ये..

पाकिस्तानचे पंतपप्रधान शहबाज शरीफ यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला, ज्याला उत्तर देणेही त्यांना शक्य झाले नाही. संयुक्त राष्ट्रात त्यांची नाचक्की झाली.

अरेरे, पाकिस्तानची मोठी नाचक्की, पंतप्रधानांना तोंड लपून पळण्याची वेळ, थेट संयुक्त राष्ट्रांमध्ये..
Pakistan Prime Minister Shehbaz Sharif
| Updated on: Sep 25, 2026 | 1:06 PM

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना संयुक्त राष्ट्र मुख्यालयात मोठा अपमान सहन करावा लागला. पत्रकाराने त्यांना लश्कर ए तैयबाचे संस्थापक दहशतवादी हाफिज सईद यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शहबाज शरीफ यांनी यावर उत्तर देणे टाळले. त्यांनी त्यावर उत्तर देण्यास नकार दिला. 81 व्या UN जनरल असेंबलीमध्ये शहबाज शरीफ UN मुख्यालयात सहभागी झाले. त्यावेळी पत्रकारांनी विचारले की, प्रधानमंत्री तुम्ही दहशतवाद्यांना सहारा देणे कधी बंद करणार आहेत? यावर शरीफ यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर ते तिथून निघून जात होते. पाकिस्तान कधीपर्यंत हाफिज सईदवर केस चालवणार. पण पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी वारंवार त्यावर उत्तर देणे टाळले. यापूर्वीच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताने पाकिस्तानला जोरदार फटकारले.

पाकिस्तानला भारताने आरसा दाखवला. भारताने स्पष्ट शब्दात सांगितले की, पाकिस्तान सीमेवर दहशतवादाला बळ देण्यापेक्षा कर्जात बु़डालेल्या अर्थव्यवस्थेला सुधारण्यासाठी पाकिस्तानने लक्ष द्यायला हवे. भारताने पाकिस्तानची प्राथमिकता पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले. भारताविरोधात कारवाया करण्यापेक्षा बुडालेल्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करावी.

जेवण, इंधन आणि लोकांच्या समस्यांकडे पाकिस्तानने लक्ष देणे आवश्यक असल्याचे भारताने म्हटले. नवी दिल्ली विदेश मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र सभेत सिंधु जल करार मुद्द्यावर पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या पत्राला भारताने केराची टोपली दाखवली. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची पार वाट लागली आहे. पण पाकिस्तानला भारतात जास्त रस आहे. जागतिक मंचावर पाकिस्तानकडून वांरवार सिंधु जल कराराचा मुद्द्या उपस्थित करण्यात आला. मात्र, याला भारताने कोणत्याही पद्धतीची भीक घातली नाही.

भारताची भूमिका स्पष्ट आहे. भारताचे स्पष्ट आहे की, एकाच वेळी रक्त आणि पाणी वाहू शकत नाही. भारताने सिंधू जल करारवरील बंदी उठवावी, याकरिता मोठे प्रयत्न पाकिस्तान करत आहे. भारतावर विविध प्रकारे दबाब आणत आहे. जागतिक कोर्टात देखील सिंधू जल कराराच्या मुद्द्यात पाकिस्तानने भारताविरोधात धाव घेतली. पहलगामवर झालेला हल्ल्याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us