AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान-तालिबान युद्धात भारत कुणाच्या बाजूने? चीन, अमेरिका-रशियाची भूमिका काय?

Pakistan Taliban War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाला सुरूवात झाली आहे. अशातच आता या युद्धात भारत नेमका कोणत्या देशाच्या बाजूने आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचे उत्तर जाणून घेऊयात.

पाकिस्तान-तालिबान युद्धात भारत कुणाच्या बाजूने? चीन, अमेरिका-रशियाची भूमिका काय?
pak afg warImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 27, 2026 | 7:02 PM
Share

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये संघर्षाला सुरूवात झाली आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. गुरूवारी रात्री पाकिस्तानी सैन्यांने अफगाणिस्तानच्या अनेक भागात हल्ले केले. त्यानंतर अफगाणिस्ताननेही पलटवार करत पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद मधील लष्करी तळांवर हल्ला केला. दोन्ही देशांमधील संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातच आता या युद्धात भारत नेमका कोणत्या देशाच्या बाजूने आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच चीन, रशिया आणि अमेरिकेची भूमिका काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

भारत

दोन्ही देशात संघर्ष निर्माण झाल्यानंतर भारताने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाबाबत एक निवेदन जारी केले आहे. भारताने म्हटले आहे की पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेला हल्ला चुकीचा होता. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, ‘पाकिस्तान या हल्ल्याद्वारे आपल्या अंतर्गत अपयशासाठी इतरांना दोष देण्याचा प्रयत्न करत आहे.’ या द्वारे भारताचा अफगाणिस्तानला उघड पाठिंबा असल्याचे समोर आले आहे.

चीन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानी सैन्यातील संघर्षांबद्दल खेद व्यक्त केला. चीनने दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि संवादाद्वारे मतभेद सोडवण्याचे आवाहन केले आहे. सध्या तरी चीनने तटस्थ भूमिका घेतली आहे.

रशिया आणि अमेरिका

पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संघर्षावर रशियाने दोन्ही देशांना संघर्ष संपवून राजनैतिक मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी म्हटले की, ‘दोन्ही बाजूंनी जीवितहानी झाली आहे, ज्यामध्ये नागरिकांचाही समावेश आहे. त्यामुळे वाटाघाटीद्वारे तोडगा काढला जावा. दरम्यान, तालिबान सरकारला मान्यता देणारा रशिया हा जगातील पहिला देश आहे, त्यामुळे रशिया तालिबानकडे झुकला जाऊ शकतो. तर अमेरिकेने अद्याप या प्रकरणावर भाष्य केलेले नाही.

दोन्ही देशांची लष्करी ताकद किती?

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या अहवालानुसार, पाकिस्तानचे सैन्य अफगाण तालिबानपेक्षा खूपच मजबूत आहे. पाकिस्तानच्या सैन्यात अंदाजे 6,60,000 सक्रिय सैनिक आहेत. तसेच पाकिस्तानकडे चिनी बनावटीची आधुनिक शस्त्रे आणि उपकरणे मिळतात. तर तालिबानकडे अंदाजे 1,72,000 सक्रिय सैनिक आहेत. तालिबानकडे काही चिलखती वाहने आणि जुने सोव्हिएत टँक आहेत. तसेच पाकिस्तानकडे अंदाजे 170 अण्वस्त्रे आहेत, तर अफगाणिस्तानकडे एकही अण्वस्त्र नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...