होर्मुझमध्ये खळबळ, भारतीय खलाशांच्या LPG टँकरवर मोठा हल्ला, 25 प्रवासी जखमी, इराणची उघड धमकी

Strait of hormuz tanker attack : इराणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. इराण आणि आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय खलाशीच धोक्यात आले आहेत. भारतीय एलपीजी टँकरवर थेट क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

होर्मुझमध्ये खळबळ, भारतीय खलाशांच्या LPG टँकरवर मोठा हल्ला, 25 प्रवासी जखमी, इराणची उघड धमकी
Strait of hormuz tanker attack
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 17, 2026 | 9:17 PM

इराण आणि आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय खलाशी असलेल्या एलपीजी टँकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाला. पनामाचा ध्वज असलेल्या ‘तारा गॅस’ या जहाजावर 24 भारतीयांसह 25 जणांचा कर्मचारीवर्ग होता. सुरुवातीला सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा हल्ला झाल्याने जहाजावरील कर्मचाऱ्यांना बाहेर पडावं लागलं आणि एक भारतीय खलाशी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली.

केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सोशल मीडियावरुन या सर्व घटनेची माहिती दिली असून बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय सुरू आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील या हल्ल्यामुळे भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading...

नेमकं काय घडलं?

ही घटना अशावेळी घडली आहे. जेव्हा होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये आणि आसपासच्या सागरी सुरक्षेबद्दल चिंता वाढली आहे. त्यामुळे गेल्या 24 तासांमध्ये जवळपास चार तेलवाहू जहाजांचे नुकसान झाल्याचीही माहिती आहे. इराणच्या नौदलाने याबाबत कळवले आहे आणि सांगितले की, पूर्वेकडील भागात आणखी एका तेलवाहू जहाजाला आग लागली. त्यांनी असा आरोप केला की, हे जहाज प्रतिबंधित क्षेत्रातून प्रवास करत होते, त्याची दिशादर्शन प्रणालीही काम करत नव्हती, त्यामुळे त्याला नौदल कारवाईचा फटका बसला. त्याचवेळी सर्व इतर जहाजांनाही याबद्दल इशारा देण्यात आला आहे. इराणशी संपर्क साधल्याशिवाय कोणीही प्रतिबंधित सागरी प्रभागात प्रवेश करु नये, असे ठणकावण्यात आले आहे. प्रसिद्ध रिपोर्टनुसार यामधून सरळ धमकावण्यात आले आहे. नियम डावलल्यास गोळीबार आणि क्षेपणास्त्र हल्ले होतील. या पार्श्वभूमिवर आता सुरक्षा आणि दक्षता वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, युके मेरिटाइम ट्रेड ऑपरेशन एजन्सीने माहिती दिली आहे की, ओमानमधील सुमारे 7 सागरी मैल किलोमीटर अंतरावर हल्ला झाला आहे. पण सुदैवाने कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झालेली नाही. ते सर्व सुरक्षित आहेत. जहाजाच्या नुकसानाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us