Bulletproof Mobile : मानल बुवा, नशिब यालाच म्हणतात…‘बुलेटप्रुफ’ फोनमुळे यु्क्रेनच्या सैनिकाला जीवनदान

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूपच चर्चेत आहे. या व्हिडिओनुसार युक्रेनच्या एका सैनिकाचे त्याच्या फोनमुळे प्राण वाचल्याचे दिसून येत आहे.

Bulletproof Mobile : मानल बुवा, नशिब यालाच म्हणतात...‘बुलेटप्रुफ’ फोनमुळे यु्क्रेनच्या सैनिकाला जीवनदान
बुलेटप्रुफ मोबाईल
| Edited By: | Updated on: Apr 20, 2022 | 4:50 PM

मुंबई : ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी मराठीतील एक म्हण प्रचंड प्रसिध्द आहे. याचीच प्रचिती नुकतीच यु्क्रेनच्या एका सैनिकाला आली असं म्हणावं लागेल. यु्क्रेनी सैनिकाचे नशिब (Luck) बलवत्तर होत म्हणून त्याला जीवनदान मिळाले आहे. याचे झाले असे, की गेल्या काही महिन्यांपासून यु्क्रेन आणि रशियात युध्द (Russia Ukraine Crisis) सुरु आहे. अनेक चर्चा झाल्यावरही यावर काही तोडगा निघालेला नाही. यासर्वांमध्ये नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात, अस दिसतयं की यु्क्रेन सैनिकाचे (soldier) प्राण एका मोबाईलमुळे वाचले आहे. असं सागण्यात येतयं की, रशियन सैनिकांकडून मारण्यात आलेली गोळी यु्क्रेन सैनिकाच्या मोबाईलला लागली आणि त्याला जीवनदान मिळाले आहे.

मायभूमीचे ऱक्षण

गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन व रशिया यांच्यात युध्द सुरु आहे. याबाबत रोज नवनवीन व्हिडिओ समोर येत आहे. युक्रेनी सैनिक जीवाची बाजी लावून आपल्या मायभूमीचे रक्षण करताना दिसत आहेत, तर तिकडे रशियन सैनिकदेखील बाँम्ब गोळ्यांचा मारा वाढवत आहेत. परंतु नुकत्याच एका व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार युक्रेनच्या सैनिकाचे त्याच्या मोबाईलमुळे प्राण वाचल्याचे दिसत आहे. दोन युक्रेनी सैनिक ऐकमेकांशी संवाद साधत आहेत. ज्याचा मोबाईल आहे तो सैनिक आपल्या सोबतच्या सैनिकाला त्याचा मोबाईल दाखवत आहे. तसेच त्या मोबाईलमध्ये झाडण्यात आलेले गोळीदेखील स्पष्ट दिसून येत आहे. तो सैनिक आपल्या साथीदाराला सांगतोय की, माझ्या मोबाईलमुळे आज मला जीवनदान मिळाले आहे. रशियन सैनिकांनी झाडलेली 7.62 एमएमची गोळी सैनिकाला लागण्याऐवजी त्याच्या मोबाईलवर आदळली. व यातून त्याचे प्राण वाचल्याचे तो सांगत आहे.

व्हिडिओतून समोर आली युध्दाची दाहकता

दरम्यान, हा व्हिडिओ शुट करताना युक्रेनच्या दोन सैनिकांमधील संवाद दिसून येत आहे. त्यातील पहिला सैनिक हा आपल्या साथीदाराला आपला मोबाईल दाखवत आज मोबाईमुळे जीवनदान मिळाल्याचे सांगण्यात आहे. या व्हिडिओमध्ये गोळीबार, बॉम्बचे आवाज स्पष्ट ऐकू येत असल्याने यातून युध्दाची दाहकतादेखील समोर आली आहे. रशियाने 24 फेब्रुवारीपासून युध्दाला सुरुवात केली होती. अद्यापही यावर काहीही तोडगा निघालेला नाही. रशियाकडून युक्रेनी सैनिकांच्या तळावर तसेच नागरी वस्त्यांवरही हल्ला चढविण्यात येत आहे.

पूर्वी युक्रेनमध्ये हल्ले वाढवले

रशियाने युक्रेनच्या पूर्वी औद्योगिक भागांमधील कोळसा खदानी, कारखाने आदींवर हल्ले वाढवून ते आपल्या प्रभावाखाली आणले आहे. यासाठी मंगळवारी संबंधित परिसरात हल्ले वाढविण्यात आले होते. रशियन सैनिकांचे मुख्य लक्ष पूर्वी डोनबास परिसरात आपले वर्चस्व निर्माण करणे हे आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या सैनिकांनी युकेनची राजधानी असलेल्या कीववर कब्जा मिळवण्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर या पूर्वी भागातील त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे.

संबंधित बातम्या :

Hazara Community : पहिल्यांदा झेलल्या तालिबान्यांच्या यातना; आता होत आहेत हल्ले, कोण आहे हजारी समाज

Imran Khan : इम्रान खानच्या सभांना जमलेल्या गर्दीमुळे पाकिस्तान लष्कराला का घाम फुटतोय?

What is Iron Beam: इस्रायलने बनवलं ‘स्टार वॉर्स’ सारखं घातक अस्त्र, जगातलं पहिल एनर्जी वेपन, काय आहे ‘आर्यन बीम’, पहा VIDEO