
Iran Israel Attack : इस्त्रायल आणि इराण यांच्यात मोठं युद्ध चालू झाला आहे. इस्रायलने इराणवर हल्ले केल्यानंतर या संघर्षात अमेरिकेनेदेखील उडी घेतली आहे. आता इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश संयुक्तपणे इराणवर हल्ले करत असल्याने जगात खळबळ उडाली आहे. इराणनेही आता इस्रायल आणि इमेरिकेला उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलच्या अनेक महत्त्वाच्या भागात हल्ले केल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार इराणने आतापर्यंत इस्रायलवर 105 क्षेपणास्त्र डागले आहेत. असे अतानाच आता मोठी माहिती समोर येत आहे. इस्रायलने आतापर्यंत सांत देशांतील अमेरिकन लष्करी तळावरही हल्ले केले आहेत. त्यामुळे काही देशांनी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारी म्हणून काही देशांनी हा निर्णय घेतला आहे.
अल जजिरा या जागतिक पातळीवरील वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे कतार, कुवैत, संयुक्त अरब अमिराती या देशांनी आपली हवाई सीमा बंद केली आहे. आता कोणत्याही देशाचे विमान या देशांच्या हवाई सीमेत प्रवेश करू शकणार नाही. या नियमाचे उल्लंघन केल्यास हे देश आता प्रत्युत्तर म्हणून मोठी कारवाई करू शकतात.
या देशांनी आपली हवाई हद्द बंद केलेली असली तरीही इराणने मात्र अनेक देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. ताज्या माहितीनुसार अबुधाबी, यूएई, बहरीण, कुवैत या देशांत अनेक ठिकाणी हल्ले झाल्याचे समोर आले आहे. इस्रायल किंवा अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर आम्हीदेखील त्यांना जशास तसे उत्तर देऊ, अशी धमकीच इराणने दिले होते. त्यानुसार आता इराणने हे हल्ले केले आहेत. हे हल्ले म्हणजे अमेरिकेला थेट आव्हान दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? अमेरिका इराणवर आणखी हल्ले करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या युद्धाचे परिणाम जगभरात पडायला सुरुवात झाली आहे. भारतात सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढत आहे. भविष्यात इंधनाचा भावही वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जातोय.