AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना काळात जग 25 वर्षे मागे, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे निरीक्षण, लशीबाबत स्वार्थ अंगलट येण्याची भीती

एखाद्या देशाने केवळ स्वतःचा बचाव करण्यावर लक्ष दिले आणि दुसऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर या महामारीमुळे होणाऱ्या त्रासामध्ये भरच पडणार आहे, असे 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन'ने अहवालात म्हटले आहे

कोरोना काळात जग 25 वर्षे मागे, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे निरीक्षण, लशीबाबत स्वार्थ अंगलट येण्याची भीती
| Updated on: Sep 15, 2020 | 5:09 PM
Share

सिअ‍ॅटल : बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन‘ने त्यांचा चौथा वार्षिक गोलकीपर्स रिपोर्ट आज प्रकाशित केला. यात कोव्हिड19 च्या चक्रवर्ती परिणामांनी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येयांना (जागतिक ध्येये) साध्य करण्याच्या गेल्या 20 वर्षांच्या प्रगतीला कशाप्रकारे खीळ घातली आहे, याची आकडेवारी देण्यात आली. (Report by the Bill & Melinda Gates Foundation warned coronavirus pandemic have halted and reversed global health progress setting it back 25 years)

जागतिक ध्येये साध्य करण्याच्या दृष्टीने होत असलेल्या प्रगतीवर या महामारीचा कशाप्रकारे परिणाम झाला आहे, हे दर्शवणारी सध्याची जागतिक पातळीवरील आकडेवारी दिली आहे. कोणत्याही दर्शकाचा विचार केला तरी जग मागे पडले आहे. कोव्हिड19 मुळे अतिगरीबीचे प्रमाण 7 टक्क्यांनी वाढले आहे. लसीकरणाची व्याप्ती, आरोग्य यंत्रणांच्या कार्यपद्धतीच्या निष्पत्तीचे प्रमाण 1990 च्या काळात जे होते ते सध्या आहे. म्हणजेच 25 आठवड्यांमध्ये जग सुमारे 25 वर्षे मागे गेले, असे निरीक्षण अहवालात नोंदवले आहे.

कोव्हिड19 मुळे बसलेल्या आर्थिक फटक्यामुळे असमानता पुन्हा एक दृढ होऊ लागली आहे. या महामारीचा महिला, वांशिकदृष्ट्या अल्पसंख्याक आणि अत्यंत गरीबीत राहणाऱ्या व्यक्तींवर अधिक परिणाम झाला आहे. जगभरात महिलांवर विनामोबदला प्रकारचे काम करण्याच्या मागणीचे ओझे वाढत आहे आणि रोजगार गमवावा लागण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. अमेरिकेत, भाडे भरण्याची ऐपत नसलेल्या कृष्णवर्णीय व लॅटिन लोकांची टक्केवारी श्वेतवर्णीयांपेक्षा दुपटीने अधिक आहे, असे अहवालातून समोर आले.

या प्रतिकूल परिस्थितीतही, बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी या महामारीचे निर्मूलन करण्यासाठीचा आणि जागतिक ध्येयांकडे वाटचाल करण्यासाठीचा मार्ग विषद केला. दरवर्षी ते दोघे मिळून हा अहवाल तयार करतात. यंदाच्या अहवालात त्यांनी डायग्नॉस्टिक्सचा विकास, लसनिर्मिती व उपचार; चाचण्या आणि डोस यांची लवकरात लवकर निर्मिती करणे; क्रयशक्ती नाही तर गरजेनुसार साधनांचा समानतेने पुरवठा करणे यासाठी जगाने परस्परांशी सहयोग करावा, असे आवाहन केले आहे.

समान निष्पत्ती साध्य करण्याच्या अनेक व्यवहार्य कृतियोजना सध्या आहेत. यात अ‍ॅक्सेस टू कोव्हिड19 टूल्स अ‍ॅक्सिलरेटर या महामारीच्या निर्मूलनासाठी राबवण्यात येणाऱ्या सहयोगात्मक उपक्रमाचा समावेश आहे. या अंतर्गत गावि, व्हॅक्सिन अलायन्स आणि ग्लोबल फंड यांसारख्या कार्यक्षम संस्था एड्स, क्षयरोग आणि मलेरिया या रोगांशी लढा देण्यासाठी एकत्र आल्या आहेत.

“कोव्हिड19 च्या साथीला सामोरे जाताना आपल्याला माणुसकीची एक बाजू दिसून आली: चाकोरीबाहेरच्या उपाययोजना, प्रत्यक्ष काम करणाऱ्यांनी केलेली कामगिरी आणि आपले कुटुंबिय, शेजारी आणि समाजाला मदत करणारे अनेक जण दिसून आले” असे बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी लिहिले आहे. “ही जगभरात उद्भवलेली समस्या आहे आणि या समस्येला जगाने एकत्रितपणे सामोरे गेले पाहिजे” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कोणताही देश एकट्याने या आव्हानावर मात करु शकत नाही, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. एखाद्या देशाने केवळ स्वतःचा बचाव करण्यावर लक्ष दिले आणि दुसऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर या महामारीमुळे होणाऱ्या त्रासामध्ये भरच पडणार आहे. लस विकसित केल्यावर आणि निर्मिती झाल्यावर ती लस सर्वांपर्यंत पोहोचली नाही तर या महामारीचे उच्चाटन होऊ शकत नाही, असेही यात म्हटले आहे.

नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटीनुसार लसीच्या पहिल्या दोन अब्ज डोसांचे समान वितरण होण्याऐवजी केवळ श्रीमंत देशांनी ते विकत घेतले तर कोव्हिड19 ने मृत्यू होणाऱ्यांची संख्या दुप्पट होऊ शकेल.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जगभरातील अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी आतापर्यंत सुमारे 18 ट्रिलियन डॉलर खर्च करण्यात आले आहेत. असे असूनही 2021 च्या अखेरपर्यंत जागतिक अर्थव्यस्थेचे 12 ट्रिलियन डॉलर किंवा त्याहून अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या अंतानंतर जागतिक जीडीपीमध्ये झालेल्या नुकसानाहूनही हे नुकसान अधिक असेल.

काही देशांमध्ये आपत्कालीन यंत्रणा आणि सामाजिक सुरक्षितता उपाययोजनांवर खर्च केल्यामुळे हलाखीची परिस्थिती उद्भवण्याला प्रतिबंध झाला. अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेचे कितीही परिणामकारकपणे व्यवस्थापन केले असले तरी त्यांच्या अर्थव्यवस्थेचा बचाव करण्यासाठी मुळातच काही मर्यादा आहेत.

या मर्यादा असूनही या देशांनी आव्हानावर मात करण्यासाठी अभिनव उपाययोजना केल्या आहेत. लसीचा आणि उपचारांचा परिणाम जाणून घेण्यासाठी पूर्वीपेक्षा खूप वेगाने उमेदवार तयार करण्यात येत आहेत. व्हिएतनाममध्ये करण्यात आलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि घानामधील पुल्ड टेस्टिंग (खर्च कमी करण्यासाठी मोठ्या संख्येने करण्यात आलेल्या चाचण्या) यासारख्या उपाययोजनांचा यात समावेश आहे. त्याचप्रमाणे 138 देशांमधील 1.1 अब्ज लोकांपर्यंत नवीन आणि सुधारित कॅश ट्रान्सफर कार्यक्रम पोहोचले आहेत. आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन आणि इतर अनेक भागीदारांनी आफ्रिकन मेडिकल सप्लाइज प्लॅटफॉर्म जून महिन्यात सुरु केले. या खंडांमधील देशांना वाजवी किमतीतील, दर्जेदार, जीव वाचवणारी साधने व आवश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात हे या प्लॅटफॉर्म्सचे उद्दिष्ट होते. यापैकी बहुतेक वस्तू आफ्रिकेतच तयार झालेल्या होत्या. (Report by the Bill & Melinda Gates Foundation warned coronavirus pandemic have halted and reversed global health progress setting it back 25 years)

कोव्हिड19 ही जागतिक समुदायाची कसोटी आहे, असे बिल आणि मेलिंडा गेट्स मानतात. “या महामारीची सर्वात चिंताजनक बाब म्हणजे आरोग्य यंत्रणा आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये उलथापालथ घडण्याबरोबरच अधिक आरोग्यदायी व उत्पादनक्षम जीवन जगण्यास सुरुवात केलेल्या व्यक्तींनी केलेली प्रगती पुसली जाऊ लागली आहे.”, असे मेलिंडा गेट्स म्हणाल्या. या परिस्थितीत अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठीच्या जागतिक पातळीवरील उपाययोजना आमच्या अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. संशोधक कोरोना व्हायरसवरील सुरक्षित, परिणामकारक लस विकसित करण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचले आहेत, पण नव्या विज्ञानाची नव्या दातृत्वाशी सांगड घालणे आवश्यक आहे. भौगोलिक भेदभाव न बाळगता प्रत्येकाला लस उपलब्ध झाली पाहिजे याची खातरजमा राजकारणातील आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील नेतृत्वांनी करणे आवश्यक आहे. आणि असे घडेल, अशी आम्हाला आशा आहे.” असेही त्या म्हणाल्या.

अमेरिकेत अगदी सहज उपचार उपलब्ध असलेल्या डायरिया (अतिसार) या आजारामुळे गरीबीमध्ये जगणाऱ्या हजारो मुलांचा मृत्यू होतो, ही बातमी वाचून बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी सार्वजनिक आरोग्याविषयी अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली आणि 20 वर्षांपूर्वी त्यांनी सार्वजनिक आरोग्यासाठी देणगी देण्याचा निर्णय घेतला. जागतिक पातळीवरील समन्वय आणि प्रयत्न यामुळे, 2000 साली प्रिव्हेंटेबल डिसीजेसमुळे (लस उपलब्ध असलेले आजार) जेवढे मृत्यू होत होते त्या तुलनेने 45 लाख मृत्यू कमी झाले.

(Report by the Bill & Melinda Gates Foundation warned coronavirus pandemic have halted and reversed global health progress setting it back 25 years)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.