Kim Jong Un Death : हुकूमशाहा किम जोंग उनचा मृत्यू? असे झाले हाल की…एकच खळबळ; आता आले नवे फोटो!
किम जोंग उन याला ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे तो कोमामध्ये गेला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात होते.

Kim Jong Un Death : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन कधी काय करेल हे सांगता येत नाही. किम जोंग उनने याआधी घेतलेल्या काही निर्णयांची तसेच उत्तर कोरियात त्याने लागू केलेल्या नियमांची नेहमीच चर्चा होते. सध्या तर त्याच्याविषयी एक अजब दावा केला जात होता. किम जोंग उनचा थेट मृत्यू झालाय, असं म्हटलं जात होतं. या दाव्याने जगभरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता त्याच्या मृत्यूविषयी नवी माहिती समोर आली आहे. त्याचे फोटो पाहून लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करतायत.
नेमका काय दावा केला जात होता?
किम जोंग उन याला ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे तो कोमामध्ये गेला होता. त्याच्यावर उपचार करण्यात आले. परंतु उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात होते. एकीकडे त्याच्या मृत्यूचा दावा केला जात असताना दुसरीकडे त्याचेच काही फोटो आता समोर आलेत. अमेरिकेत राहणारे चीनच्या सीडीपीचे संचालक वानजून शी यांनी हा दावा केला होता. एक्स या समाजमाध्यमावर त्यांनी याबाबत अनेक पोस्ट केल्या होत्या. 19 ऑक्टोबर रोजीच्या त्यांच्या एका पोस्टमध्ये किम जोंग उन यांना ब्रेन हॅमरेज झाला असून त्यांची स्थिती गंभीर आहे. ते कोमामध्ये आहेत, असं शी यांनी म्हटलं होतं.
चीनमधून डॉक्टर पाठवले
तसेच, चीनमधील पेकिंग यूनियन मेडिकल कॉलेजच्या तज्ज्ञ डॉक्टरांना किम यांच्यावर उपचार करण्यासाठी उत्तर कोरियात पाठवण्यात आले आहे. पुढच्या उपचारासाठी त्यांना चीनमध्येही हलवण्यात आले होते. परंतु डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाहीत, असंही शी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
आता नेमके कोणते फोटो समोर आले?
दरम्यान, एकीकडे किम जोंग उन यांच्या मृत्यूचा दावा केला जात असताना त्यांचेच काही फोटो समोर आले आहेत. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार सध्या व्हायरल होत असलेले हे फोटो उत्तर कोरियातील शासकीय वृत्तसंस्था केसीएनएने प्रसिद्ध केले आहेत. या फोटोंमध्ये किम जोंग उन लहान मुलांचे बुट पाहात आहेत. त्यांच्यासोबत काही अधिकारीदेखील आहेत. हे फोटो पाहून किम जोंग उन जिंवत आहेत, असं म्हटलं जातंय. हे फोटो बाहेर आले असले तरीही उत्तर कोरियाने किम जोंग यांच्या मृत्यूवर सुरू असलेल्या अफवेवर कोणतेही भाष्य केलेले नाही.
