AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खबरदार यापुढे भारताला… रशियाची थेट अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी

US Tariffs on Russia : अमेरिका ही फक्त आणि फक्त टॅरिफच्या मुद्द्यावरून अनेक देशांवर दबाव टाकण्याचे काम करताना दिसत आहे. भारतावर मोठा टॅरिफ लावल्यानंतरही धमकावण्याचे काम अमेरिकेचे सुरू आहे. आता रशिया अमेरिकेच्या विरोधात मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे.

खबरदार यापुढे भारताला... रशियाची थेट अमेरिकेसह डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी
India China Russia
| Updated on: Sep 19, 2025 | 8:09 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे सहकारी मागील काही दिवसांपासून भारतासह चीनला रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता धमकावताना दिसत आहेत. भारतावर तर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावला असून काही निर्बंध घालण्याची भाषा बोलली जात आहे. अनेक वर्षांपासूनचे भारत आणि अमेरिकेतील चांगले संबंध तणावात आहेत. दुसरीकडे अमेरिका स्वत: चीनवर टॅरिफ लावत नाहीये. मात्र, नाटो देशांना एक पत्र लिहून त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, चीन जोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करतो तोपर्यंत आणि युक्रेन रशिया युद्ध थांबेपर्यंत 50 किंवा 100 टक्के टॅरिफ चीनवर लादा.

आता भारत आणि चीनला सातत्याने धमकावणाऱ्या अमेरिकेला जोरदार उत्तर रशियाने दिला आहे. रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लावरोव यांनी अमेरिकेची निंदा करत त्यांच्यावर टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, अमेरिका भारत आणि चीनला अशाप्रकारे धमक्या देऊन अल्टीमेटम देऊ शकत नाही. अमेरिकेच्या टॅरिफवर बोलताना त्यांनी म्हटले, यामुळे देश नवीन संशोधन आणि ऊर्जा बाजार शोधण्यासाठी मजबूर होत आहे.

अमेरिकेची नैतिकता आणि रणनीती पूर्णपणे चुकीची आहे. भारत आणि चीन दोन्ही महान देश असून त्यांचा इतिहास मोठा आहे. एक तर हे करा जे मला आवडते नाही तर मी तुमच्यावर टॅरिफ लावणार अशी भाषा त्यांच्यासोबत करणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि यामुळे तुमचे कामही होणार नाही. भारतावर अमेरिकेने जी कारवाई केली ती अत्यंत चुकीची, अन्यायकारक आणि अव्यवहारिक असल्याचे स्पष्ट त्यांनी म्हटले. भारताचे स्पष्ट मत आहे की, त्यांची ही ऊर्जा निती पूर्ण जगासाठी चांगली आहे आणि जागतिक बाजारपेठेसाठी देखील.

भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर रशिया हा भारताच्या मदतीला धावून आला. हेच नाही तर पुतिन यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवर संवाद साधला. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताचे होणारे नुकसान कशाप्रकारे भरून काढता येईल, यावर रशियाच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू केले. हेच नाही तर भारताच्या वस्तूंचे आम्ही आमच्या बाजारपेठेत पूर्वीपेक्षाही मोठ्या प्रमाणात स्वागत करू असे स्पष्ट रशियाने म्हटले. भारतावर अमेरिकेच्या टॅरिफचा फार परिणाम पडला नाही पण अमेरिकेच्या बाजारपेठेवर वाईट परिणाम झाल्याचे दिसत आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?