AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रशिया संकटात, भारतावरही होणार परिणाम?, युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान..

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले असून या युद्धाची झळ संपूर्ण जगाला सोसावी लागत आहे. हेच नाही तर आता युक्रेनवरील हल्ले देखील रशियाने वाढवली आहेत. अमेरिका हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मोठी बातमी! रशिया संकटात, भारतावरही होणार परिणाम?, युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान..
Russia
| Updated on: Sep 29, 2025 | 5:12 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका फक्त या दोन देशांना नाही तर संपूर्ण जगाला बसताना दिसतोय. भारताला देखील या युद्धाची झळ बसली असून अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेने टॅरिफ लावला. यासोबतच गंभीर आरोप करत अमेरिकेने म्हटले की, भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. भारताकडून आलेल्या पैशातून रशिया युक्रेन विरोधात शस्त्र खरेदी करून युक्रेनी लोकांचा जीव घेत आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा शांतीचा मार्ग दिल्लीहून जातो. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद केली तर हे युद्ध थांबवण्यास मदत होईल.

हेच नाही तर रशिया युक्रेन यांच्या युद्धात अमेरिकेने देखील मध्यस्थी केली. मात्र, अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर हे युद्ध अधिकच भडकताना दिसत आहे. 28 सप्टेंबरच्या रात्री रशियाने युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. रशियाचा युक्रेनवरील हल्ला तब्बल 12 तास सुरू होता. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यात चार लोकांना मृत्यू झाला तर 70 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींमध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश आहे.

यावेळी रशियाच्या निशाण्यावर युक्रेनची राजधानी कीव होती. कीवमध्ये सर्वाधिक हल्ले करण्यात आली. युक्रेनच्या सात शहरांमध्ये मोठे नुकसान रशियाच्या हल्ल्यानंतर झाले. आता रशियासाठी एक अत्यंत वाईट बातमी पुढे येताना दिसतंय. दक्षिण रोस्तोव्ह प्रदेशातील कृषी क्षेत्रासाठी संघीय स्तरावरील आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळामुळे जूनमध्ये कृषी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

सरकारचा अंदाज आहे की, यावर्षी दुष्काळामुळे 10 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे रशियाच्या धान्य उत्पादनावर थेट परिणाम झाला. कृषी आणीबाणी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मागता येते. रशियामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे रशियावर अमेरिकेसह इतर देशाचाही मोठा दबदबा बघायला मिळतोय. रशियाने युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र झाल्याचेही बघायला मिळत आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा