AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासह जगाला रशियाचा मोठा धक्का, थेट धक्कादायक घोषणा, जगात हाहाकार..

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू असताना भारताला मोठा झटका बसला आहे. रशियाकडून घेण्यात आलेल्या एका निर्णयाने जगाची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे. युद्धादरम्यान ऊर्जेचे संकट जगावर असताना रशियाने मोठी घोषणा केली.

भारतासह जगाला रशियाचा मोठा धक्का, थेट धक्कादायक घोषणा, जगात हाहाकार..
Russia
| Updated on: Apr 01, 2026 | 8:03 AM
Share

28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेकडून मोठा हल्ला करण्यात आला. युद्धाला सुरूवात झाली. इराणकडून ज्या ज्या देशात अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, अशा ठिकाणी हल्ले करण्यात आली. आखाती देश काही तासात संकटात आली. विमानतळांवर मोठे हल्ले झाले. युद्ध फक्त जमिनीपुरते मर्यादित राहिली नाही तर थेटपणे गॅस प्रकल्प आणि तेल रिफायनरीवर हल्ले करण्यात आली. इराणकडून युद्धात होर्मुज खाडी बंद करण्यात आली. जगात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला. इराणकडून इस्त्रायल, अमेरिका आणि त्यांना मदत करणाऱ्या देशाचे जहाज होर्मुजवरून जाऊ दिले जात नाही. या युद्धामुळे जग कोंडीत अडकले. यातून मार्ग काढण्याकरिता अमेरिकेने रशियाच्या तेलावर असलेले सर्व निर्बंध हटवले आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन केले. काही महिन्यांपूर्वीच याच रशियाच्या तेलावर अनेक निर्बंध अमेरिकेने लादले होते.

भारतावर मोठा टॅरिफ फक्त भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने लावण्यात आला. भारतासह अन्य देशांमध्ये कच्चे तेल आणि गॅलचा तुटवडा आहे. मात्र, भारताच्या मदतीला रशिया धावून आला. यामुळे भारतात कच्च्या तेलाचा तेवढा तुटवडा नाही. भारताचा अनेक वर्षांचा मित्र मदतीला आल्याने पाकिस्तानसारखी वेळ नक्कीच भारतावर आली नाही.

संपूर्ण जग ऊर्जेच्या वेगळ्या संकटात असताना रशिया देव बनून आला, पण आता जगाची झोप उडवणारी बातमी पुढे आली. 31 जुलैपर्यंत रशिया पेट्रोल निर्यात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. रशियाच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. कारण सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये जग फक्त रशियाकडून आशेने बघत होते. मात्र, रशियाच्या या निर्णयाने सर्वांचीच झोप उडाली.

काही दिवसांपूर्वी युक्रेनने रशियाच्या तेल पाईपलाईनवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता रशियाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करतो. रशियाचा हा निर्णय भारतासाठी सर्वात जास्त धक्कादायक असणार आहे. भारतात मोठ्या प्रमाणात तेलाची मागणी आहे आणि त्यामध्ये रशियाने पेट्रोल निर्यात बंद केली.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा