AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हल्ल्याची तयारी करा, पुतिन यांचा संयम सुटला; अमेरिका, इराण युद्धादरम्यान सर्वात मोठी बातमी, जग हादरलं

मोठी बातमी समोर येत आहे, एकीकडे अमेरिका आणि इराणमधील संघर्ष सुरूच आहे. तर दुसरीकडे आता रशियानं आक्रमक भूमिका घेतली आहे, पुतिन यांचा संयम सुटल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी सैन्याला थेट आदेश दिले आहेत.

हल्ल्याची तयारी करा, पुतिन यांचा संयम सुटला; अमेरिका, इराण युद्धादरम्यान सर्वात मोठी बातमी, जग हादरलं
Russian President Vladimir PutinImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 23, 2026 | 6:17 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील संघर्ष सुरूच आहे. नुकताच इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये इराणने काही अटी ठेवल्या आहेत, या अटी जर अमेरिकेनं मान्य केल्या तर आम्ही युद्ध थांबवू असं इराणने म्हटलं आहे, ज्यामध्ये अमेरिकेनं आम्हाला युद्धाची नुकसानभरपाई द्यावी, स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील नाकेबंदी हटवावी अशा काही अटी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत. दरम्यान दुसरीकडे मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमक्या देण्यात येत आहेत, तुम्ही जर लवकरात लवकर अणु करार केला नाही तर आम्ही तुमच्यावर भीषण हल्ला करू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता जगाची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.

युक्रेनकडून रशियामधील एका होस्टेलवर हल्ला करण्यात आला होता, या हल्ल्यानंतर रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. हल्ल्याची तयारी करा असे थेट आदेश पुतिन यांनी रशियाच्या सैन्याला दिले आहेत. रशियाकडून असा दावा करण्यात आला आहे की, युक्रेनच्या सैन्याने शुक्रवारी स्टारोबिलक्स शहरात एका विद्यार्थ्यांचा निवास असलेल्या होस्टलवर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे. सामान्य जनतेवर आणि होस्टलेवर झालेले असे हल्ले आम्ही कधीही सहन करणार नाहीत, या हल्ल्याचं उत्तर दिलं जाईल असं पुतिन यांनी म्हटलं आहे. दरम्यान रशिया आणि युक्रेमध्ये 2022 पासून युद्ध सुरू आहे, हे युद्ध सुरू होऊन जवळपास पाच वर्ष झाले आहेत. मात्र आता रशियाकडून युक्रेनवर भीषण हल्ला होण्याची शक्यता आहे.

रशियाच्या सरकारकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार युक्रेनने जाणीवपूर्वक रशियातील एका विद्यार्थी वस्तीगृहाला लक्ष बनवलं, युक्रेनकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर या परिसरात रात्रभर हल्ले सुरूच होते, या हल्ल्यांमध्ये 38 अन्य लोक देखील जखमी झाले आहेत. त्यानंतर आता रशियाकडून युक्रेनला बदला घेतला जाईल अशी धमकी देण्यात आली आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....