AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाज वाटली पाहिजे, 66000 मृतदेहांवर…’, ट्रम्पच्या नादाला लागणं शहबाजना महाग पडलं, पाकिस्तानी जनता आपल्या PM वर तुटून पडली

"पाकिस्तानचे पंतप्रधान आणि फिल्ड मार्शल सुरुवातीपासूनच आमच्या सोबत होते. ते खूप शानदार आहेत. त्यांनी स्टेटमेंट दिलय की ते या प्लानमध्ये आमच्यासोबत आहेत. त्यांनी पूर्णपणे या प्लानच समर्थन केलय" असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

'लाज वाटली पाहिजे, 66000 मृतदेहांवर...', ट्रम्पच्या नादाला लागणं शहबाजना महाग पडलं, पाकिस्तानी जनता आपल्या PM वर तुटून पडली
Donald Trump-shehbaz sharif
| Updated on: Sep 30, 2025 | 1:54 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा युद्ध संपवण्यासाठी शांततेचा एक प्रस्ताव मांडलेला आहे. त्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू राजी झालेले आहेत. ट्रम्प यांच्या प्रस्तावानुसार इस्रायलला गाजामध्ये सैन्य कारवाई थांबवावी लागेल. हमासला जिवंत आणि मृत बंधकांना टप्याटप्याने परत करावं लागेल. त्यांना शस्त्र खाली ठेवावी लागतील. प्रस्तावावर दोन्ही पक्षांची सहमती झाल्यानंतर गाझामध्ये मानवी सहाय्यता बहाल करण्यावरील निर्बंध हटवता येतील. या 20 सुत्री गाझा प्लानमुळे पॅलेस्टाइन राष्ट्र निर्मिताचा मार्ग उघडला जाईल.

ट्रम्प यांनी नेतन्याहूंसोबत एका प्रेस कॉन्फरन्समध्ये गाझा प्लान सादर केला. यावेळी त्यांनी नुकतेच खास बनलेले पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा उल्लेख केला. “पाकिस्तानचे पंतप्रधान आणि फिल्ड मार्शल सुरुवातीपासूनच आमच्या सोबत होते. ते खूप शानदार आहेत. त्यांनी स्टेटमेंट दिलय की ते या प्लानमध्ये आमच्यासोबत आहेत. त्यांनी पूर्णपणे या प्लानच समर्थन केलय” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

इस्रायलला अजून पाकिस्तानने मान्यता दिलेली नाही

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सोशल मिडिया साइट एक्सवर एक टि्वट केलं. त्यांनी ट्रम्प यांच्या गाझा प्लानच समर्थन केलं. पाकिस्तानने इस्रायलला अजूनपर्यंत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नाही. गाझामध्ये इस्रायली हल्ल्याला नरसंहार म्हटलय.

पाकिस्तानात खूप टीका

शहबाज शरीफ किंवा पाकिस्तानचे मंत्री आतापर्यंत इस्रायलसाठी ‘जायोनिस्ट रिजीम’ या शब्दाचा वापर करायचे. जायोनिस्ट रिजीम म्हणजे इस्रायलला एक देश म्हणून कधीच मान्यता देणार नाही असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं होतं. आता ते टू स्टेट सॉल्यूशन बद्दल बोलत आहेत. याचा अर्थ पाकिस्तान इस्रायलला मान्यता द्यायला तयार आहे. शहबाज शरीफ यांच्या या बदलेल्या भूमिकेवर पाकिस्तानात खूप टीका होत आहे.

हे गुन्हेगारांना साथ देण्यासारखं

नईम उर रहमानी नावाच्या एक वेरिफाइड पाकिस्तानी यूजरने शहबाज शरीफवर टीका करताना लिहिलय की, “आम्ही पंतप्रधानांच वक्तव्य फेटाळून लावतो. संयुक्त राष्ट्राच्या चार्टरमध्ये स्पष्टपणे म्हटलय की, कुठल्या देशाची जमीन ताब्यात घेतली असेल, तर त्यांना सशस्त्र संघर्षाचा अधिकार आहे. कुठलीही ताकद हा अधिकार जबरदस्तीने हिसकावून घेऊ शकत नाही” “66 हजार शहीद पॅलेस्टिनींच्या मृतदेहांवर उभ राहून तथाकथित शांती प्रस्तावाच कौतुक करणं हे गुन्हेगारांना साथ देण्यासारख आहे” असं या युजरने पुढे लिहिलय.

Follow Us
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान