AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा..

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. वाद वाढताना दिसत आहे. यादरम्यानच आता अमेरिकेत खळबळ उडवणारी घटना घडलीये. इराणसोबत युद्ध सुरू असताना अमेरिकेला मोठा धक्का बसलाय.

अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा..
America shocking incident
| Updated on: Jun 02, 2026 | 9:45 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यानच एक खळबळ उडवणारी माहिती पुढे येत आहे. अमेरिकेत एकच हाहाकार उडाला. इराण आणि अमेरिका यांच्या युद्धाला आता 3 महिने होऊ गेले. मात्र, युद्ध काही कमी होत नाही. शिवाय प्रचंड तणाव आहे. या युद्धाचा परिणाम जागतिक बाजारापेठेवर पडतोय. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प ज्या हॉटेलमध्ये होते, तिथे गोळीबार झाला. यादरम्यानच आता अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे.  अमेरिकेतील आयोवा राज्यातील मस्कटाईन शहरात अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबाराच्या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण बघायला मिळाले. या गोळीबारमध्ये तब्बल 7 जणांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 7 जणांचा जीव या गोळीबाराच्या घटनेत गेला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारी सुमारे 12 वाजून 12 मिनिटांनी ही घटना घडली.  पार्क अव्हेन्यूवरील एका घरातून गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. घरात गोळ्या लागून मृत पावलेले चार जण पोलिसांना मिळाले. 52 वर्षीय रायन विलिस मॅकफार्लंड नावाचा संशयित घटनास्थळावरून पळून गेला.

त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच त्याला शोधून काढले. पोलिसांना बघताच त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली.   पोलिसांनी त्याला वाचवण्याकरिता मोठे प्रयत्न केले, पण त्याला वाचवण्यात यश मिळाले नाही. अजून दोन मृतदेहही पोलिसांना मिळाली. या घटनेबाबत बोलताना पोलिसांनी म्हटले की, ही घटना काैटुंबिक वादातून घडली आहे. सर्वच पीडित एकाच घरातील सदस्य आहेत.

पुढे पोलिस अधिकाऱ्याने बोलताना म्हटले की, लोकांनी भीती दूर करावी. हा वाद त्यांच्या कुटुंबातील होता. त्यानंतर ही घटना घडली. समाजाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. संशयिताची ओळख त्वरित पटवण्यात आली असून घटनेनंतर शहरातील सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सामान्य आहे. मात्र, या घटनेने लोकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला होता. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. नक्की कोणत्या कारणाने ही घटना घडली, याबाबत माहिती मिळू शकली नाहीये.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात