AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेक्सिकोमधील परिस्थिती गंभीर, हवेत फक्त धूर, मोठा हिंसाचार, थेट..

मेक्सिकोमधील परिस्थिती तणावात आहे. मोठा हिंसाचार त्याठिकाणी झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता सरकारकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, तणाव अधिकच वाढताना सध्याच्या परिस्थितीला दिसत आहे.

मेक्सिकोमधील परिस्थिती गंभीर, हवेत फक्त धूर, मोठा हिंसाचार, थेट..
Mexico
| Updated on: Feb 23, 2026 | 12:07 PM
Share

मेक्सिकोमध्ये मोठी खळबळ उडालीये. मेक्सिको सुरक्षा दलांनी रविवारी जगातील सर्वात धोकादायक ड्रग्ज तस्करापैकी एकाची हत्या केली. ज्यानंतर मोठी हिंसा झाली. जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल (सीजेएनजी) चा प्रमुख नेमेसियो रुबेन ओसेगुएरा यांना ठार मारले. त्याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली आणि मोठी हिंसा पेटली. सध्या परिस्थिती तणावात असल्याचे सांगितले जात आहे. बंदुकधारी काही लोकांनी वाहनांना मोठी आग लावली. सुरक्षारक्षकांकडून या लोकांवर कारवाई केली जात आहे आणि त्यांना अटक केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता प्रयत्न केली जात आहेत.  सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारकडून शाळा बंद केल्या आहेत.

यासोबतच पंतप्रधान क्लाउडिया यांनी लोकांना शांत राहण्याचे आव्हान केले. मिळालेल्या माहितीनुसार, प्यूर्टेा वल्लार्टा आणि त्याच्या आसपास हिंसा सुरू झाली. या हिंसेवर नियंत्रण मिळवण्याकरिता सुरक्षादलांनी सकाळी मोठे सैन्य ऑपरेशन राबवले. जलिस्को, कोलिमा, मचोआकन आणि गुआनाजुआटो मधील राज्यात वाहनांना आणि इमारतींना आग लावून हायवे ब्लॉक करण्यात आला.

या जाळपोळीमुळे हवेत फक्त आणि फक्त मोठा धूर बघायला मिळाला. मेक्सिकोमधील हिंसाचाराचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. ग्वाडालाजारा एअरपोर्टवर लोक घाबरून इकडे तिकडे पळताना व्हिडीओमध्ये दिसले. सुरक्षा रक्षकांकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही राज्यांमधील भीषण हिंसा लक्षात घेता राज्यपाल पाब्लो लेमन यांनी लोकांच्या घरामध्येच राहण्याचा सल्ला दिला.

सुरक्षा कारणांमुळे काही सेवा देखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत परिस्थिती ही पूर्णपणे नियंत्रणात येणार नाही, तोपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. नेमेसियो रुबेन हा अगोदर पोलिस विभागात कामाला होता. तो अमेरिकेत काही वर्ष वास्तव्यास होता, त्यानंतर त्याला मेक्सिकोमध्ये पाठवण्यात आले. त्याने ड्रग्ज तस्करीचे मोठे साम्राज्य निर्माण केले, अखेर त्याला मारण्यात मोठे यश मिळाले.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा