AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fuel Price : पेट्रोल 434 तर डिझेल 407 रुपये लिटर, भारताच्या शेजारील देशात महागाईने हाहाकार

Global Energy Crisis : जगाच्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे 20 टक्के पुरवठा करणारी होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटनपासून भारतापर्यंत अनेक देशांमध्ये तेलटंचाई निर्माण झाली आहे.

Fuel Price : पेट्रोल 434 तर डिझेल 407 रुपये लिटर, भारताच्या शेजारील देशात महागाईने हाहाकार
Fuel Price in Shri LankaImage Credit source: Google
| Updated on: May 31, 2026 | 5:51 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे संपूर्ण जगात ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. जगाच्या एकूण तेल गरजेपैकी सुमारे 20 टक्के पुरवठा करणारी होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्याने पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटनपासून भारतापर्यंत अनेक देशांमध्ये तेलटंचाई निर्माण झाली आहे. भारताचा शेजारी देश श्रीलंकेत परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. येथे पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने मोठी वाढ होत आहे. सध्या श्रीलंकेत 1 लिटर पेट्रोलची किंमत 434 रुपयांवर, तर डिझेलची किंमत 407 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.

पेट्रोल-डिझेलसोबत रॉकेलही महाग

गेल्या काही काळापासून श्रीलंकेत सतत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. रॉकेलच्या किमतीही वाढ झाली आहे. श्रीलंकेची सरकारी पेट्रोलियम कंपनी सीलोन पेट्रोलियम महामंडळ (CPC) ने शनिवारी नवीन दर जाहीर केले आहेत. यानुसार एक लिटर पेट्रोलसाठी स्थानिक 434 रुपये आणि डिझेलसाठी स्थानिक 407 रुपये मोजावे लागत आहेत.

तीन महिन्यांत पाचव्यांदा दरवाढ

जागतिक तेल संकटाचा श्रीलंकेवर गंभीर परिणाम झाला आहे. गेल्या तीन महिन्यांत इंधन दरात ही पाचव्यांदा वाढ करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी यापूर्वीही नागरिकांना इंधन वापर कमी करण्याचे आवाहन केले होते. CPC च्या माहितीनुसार, पेट्रोलच्या दरात 5.85 टक्के, तर डिझेलच्या दरात 3.83 टक्के वाढ करण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर 1 मार्च ते 31 मे या कालावधीत श्रीलंकेत इंधन दरांमध्ये पाच वाढ करण्यात आली आहे.

फेब्रुवारीच्या अखेरीस श्रीलंकेत पेट्रोलची किंमत 293 रुपये प्रति लिटर होती, ती आता वाढून 434 रुपये प्रति लिटर झाली आहे. म्हणजेच या काळात पेट्रोलमध्ये तब्बल 141 रुपयांची वाढ झाली आहे. फक्त पेट्रोल-डिझेलच नव्हे, तर पश्चिम आशियातील संघर्षाचा इतर आर्थिक परिणामही श्रीलंकेला सहन करावा लागत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेने धोरणात्मक व्याजदरात 100 बेसिस पॉइंट म्हणजेच 1 टक्क्यांची वाढ केली असून त्यामुळे कर्ज महाग झाले आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच