AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Philippines earthquake : भीषण भूकंप, इमारती कोसळल्या, होत्याच नव्हतं झालं, आतापर्यंत 60 ठार, आकडा वाढण्याची भिती

Philippines earthquake : एका वरिष्ठ आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितलं की, 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप खूप शक्तीशाली होता. अनेक इमारती कोसळल्या. 60 लोकांचा मृत्यू झाला. प्रभावित क्षेत्रात मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

Philippines earthquake : भीषण भूकंप, इमारती कोसळल्या, होत्याच नव्हतं झालं, आतापर्यंत 60 ठार, आकडा वाढण्याची भिती
Philippines earthquake
| Updated on: Oct 01, 2025 | 9:29 AM
Share

फिलीपींसला मंगळवारी 6.9 रिश्ट स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे फिलीपींसच्या अनेक भागात मोठं नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. आतापर्यंत हाती आलेल्या वृत्तानुसार 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. भूकंपाचं केंद्र आणि प्रभावित क्षेत्रांबद्दल अजून पूर्ण माहिती हाती आलेली नाही. सुरुवातीच्या रिपोर्ट्समध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जिवीतहानी झाल्याची पृष्टी करण्यात आली आहे.

स्थानिक वेळेनुसार, दुपारनंतर अनेक भागात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यामुळे लोकांमध्ये भिती, घबराट पसरली. लोक पळतच आपल्या घराच्या व ऑफिसच्या बाहेर पडले. भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, खासकरुन जुन्या रचना असलेल्या इमारती पूर्णपणे कोसळल्या. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. फिलीपींसमधील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भिती

फिलीपींसमधील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरु केलं आहे. ढिगाऱ्याखालून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं दिवस-रात्र काम करत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे. कारण अजून अनेक लोक बेपत्ता आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टर, मेडीकल स्टाफ जखमींवर उपचार करुन त्यांची काळजी घेत आहे.

त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी

एका वरिष्ठ आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्याने सांगितलं की, 6.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप खूप शक्तीशाली होता. अनेक इमारती कोसळल्या. 60 लोकांचा मृत्यू झाला. प्रभावित क्षेत्रात मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. वीज पुरवठा आणि कम्युनिकेशन सेवा काही भागात बाधित झाली आहे. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

हा देश’रिंग ऑफ फायर’मध्ये मोडतो

फिलीपींसमध्ये नेहमी भूकंपाचा धोका असतो. कारण हा देश प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’मध्ये मोडतो. तिथे टेक्टोनिक प्लेटच्या हालचाली वारंवार भूकंप आणि ज्वालामुखी स्फोटाला कारण ठरतात. अलीकडच्या काही वर्षात फिलीपींसमध्ये अनेक मोठे भूकंप आले आहेत. यात 2013 साली आलेला बोहोल भूकंप आहे, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 होती. यात शेकडो लोकांचा मृत्यू झालेला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं