
सूडानच्या एअरफोर्सने आपल्याच देशातील दारफुर शहराच्या एअरपोर्टवर एअर स्ट्राइक केला. हा एअरपोर्ट रॅपिड सपोर्ट फोर्सेजच्या नियंत्रणाखाली होता. ही एक बंडखोर अर्धसैनिक फोर्स आहे. या हल्ल्यात UAE च एक सैन्य विमानं नष्ट झालं. त्यात भाड्याचे 40 कोलंबियन सैनिक मारले गेले. सूडानी अधिकाऱ्यांनुसार हा एअरस्ट्राइक एकदिवस आधी केला होता. या स्ट्राइकमध्ये भाड्याच्या सैनिकांनी गोळा केलेली शस्त्रास्त्र नष्ट करण्यात आली.
सूडानच सैन्य आणि RSF मध्ये एप्रिल 2023 पासून तणाव आहे. आतापर्यंत हजारो लोकांचा या तणावामध्ये बळी गेला आहे. 1.4 कोटी लोकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. यामुळे देशाच्या अनेक भागात उपासमारीच संकट आहे. त्याशिवाय नरसंहार आणि बलात्कारासारखे गुन्हे सुद्धा घडतायत. या सगळ्या प्रकरणात इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टाकडून तपास सुरु आहे.
UAE ची प्रतिक्रिया काय?
सूडानच्या एअरफोर्सने दारफूरची राजधानी न्यालाच्या एक एअरपोर्टवर हा एअरस्ट्राइक केला. हा स्ट्राइक म्हणजे बंडखोरांविरोधात एक संदेश आणि परदेशी हस्तक्षेपाविरुद्ध कारवाई आहे. अमीरातच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सूडानच्या संघर्षात आमचा कोणताही रोल नाही, हे अमीरातकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आलय. या विषयी RSF कडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नागरिक विमानतळाच्या जागेला सैन्य तळामध्ये बदललं
भाड्याच्या सैनिकांच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत असं कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी एक्सवर म्हटलय. मागच्यावर्षी RSF ने न्याला शहर ताब्यात घेतलं होतं. RSF ने नागरिक विमानतळाच्या जागेला सैन्य तळामध्ये बदललं, असा सूडानी सरकारचा आरोप आहे. इथून शस्त्रांचा पुरवठा आणि सोन्याची तस्करी चालते. संयुक्त राष्ट्राच्या एक्सपर्टनी सुद्धा एप्रिल महिन्यात जारी झालेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलेलं की, कोलंबियाचे भाड्याचे सैनिक दारफुरमध्ये आहेत. एका खासगी सुरक्षा कंपनीने त्यांना RSF च्या मदतीसाठी पाठवलेलं.
यूएईने अशी कारवाई केली
यूएईने सूडानच्या एअर स्ट्राइकवर भले कोणती प्रतिक्रिया दिली नसेल, पण सूडानची विमानं रोखली आहेत. बुधवारी सू़डानी विमानांना अबूधाबी एअरपोर्टवरुन उड्डाण करण्यास मनाई करण्यात आली असं सूडानी विमान एजन्सीकडून सांगण्यात आलं. सूडान आणि यूएईचे संबंध आधीपासूनच तणावपूर्ण आहेत. खार्तूम सरकारने RSF ला अमिरात सरकारकडून समर्थन मिळत असल्याचा आरोप केला होता.